Share

रोहित शर्मामुळे ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्यात खडाजंगी; काय झालं नेमकं? पाहा व्हिडीओ

सध्या टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फलंदाजीसाठी कोण जाणार यावरुन त्यांच्यात वाद झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट्स येत आहेत.

रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला आशिया चषक २०२२ च्या सुपर ४ मध्ये सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. टीम इंडियाला आधी पाकिस्तान आणि नंतर श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या संपूर्ण सामन्यात टीम इंडिया बॅकफूटवर दिसली.

ड्रेसिंग रुमचे वातावरणही संपूर्ण सामन्यात गोंधळलेले दिसले. अशा परिस्थितीत ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याचा ड्रेसिंग रुममधून जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे टीम इंडियातील अंतर्गत वाद पुढे आला आहे. माहितीनुसार, पंत आणि हार्दिक यांच्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण जाणार यावरुन ही तू-तू, मी-मी झाल्याचं समजत आहे.

या व्हिडीओमध्ये पंत आणि पंड्या दोघेही एकाच जागी बसले होते आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव आऊट झाला. सहसा फलंदाज बाद झाल्यावर पुढे कोण येणार, हे आधीच ठरवले जाते. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर पंतला फलंदाजीला जायचे होते तरी रोहित शर्मा याने अचानक हार्दिक पांड्या याला फलंदाजीसाठी पाठवले.

https://twitter.com/saqlain692022/status/1567185772310044673?t=5uIYvufhGpJaJwXsM0n5Iw&s=19

रोहितच्या या निर्णयानंतर वातावरण थोडे तापले. कोण फलंदाजी करणार हे दोन्ही फलंदाजांना समजत नव्हते. प्रत्यक्षात कोण फलंदाजीला उतरेल असा प्रश्न दोन्ही फलंदाजांना पडलेला दिसत होता. त्यानंतर रोहितचे हावभाव पाहून हार्दिक फलंदाजीला आला.

दरम्यान, टीम इंडिया आशिया कप २०२२ मधून जवळपास बाहेर पडली आहे. टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील दोन्ही मॅच जिंकल्या होत्या, पण सुपर-४ मध्ये ते पूर्णपणे अपयशी ठरले होते. आशिया कप २०२२ च्या सुपर-४ मध्ये टीम इंडियाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

खेळ

Join WhatsApp

Join Now