Share

माणुसकीला काळीमा! TVचा आवाज वाढवून अल्पवयीन मुलीला बनवलं वासनेची शिकार, नराधम अटकेत

raped

एकीकडे देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना या सातत्याने घडत आहेत. अशातच पिंपरी चिंचवड (Pimpri chinchwad) परिसरातील म्हाळुंगे याठिकाणी एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (rise tv volume and raped minor girl)

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीनं पीडित मुलीला भाजी बनवण्यासाठी घरी बोलावून तिच्यासोबत विकृतीचा कळस गाठला आहे. नराधमाने पीडित मुलीचा ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये, म्हणून टीव्हीचा आवाज वाढवून चिमुकलीवर बलात्कार केला आहे.

पीडित मुलीनं आपल्या घरी आल्यानंतर आई वडिलांना हा प्रकार सांगितला आहे. या प्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. योगेश साहेबराव चाटी असं अटक केलेल्या नराधम आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश याची पत्नी कामावर गेली होती.

दरम्यान, पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (POCSO) अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अत्याचार झाल्यानंतर घाबरलेल्या पीडित मुलीनं घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला आहे.

या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने म्हाळुंगे पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पोक्सोसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनांचे प्रमाण अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
राहूलचा रेकाॅर्ड; बनला IPL मधील सर्वात जास्त कमाई करणारा खेळाडू; आकडा वाचून हैराण व्हाल
अजित पवार इमानदारीने काम करतात, पण त्याची जाहीरात कधीच करत नाहीत; नाना पाटेकरांनी केलं कौतूक
मी निवडणूकीतून माघार घेईल पण..;उत्पल पर्रीकरांनी भाजपसमोर ठेवली ही साधी अट; अट वाचून कौतूकच वाटेल
“मी तुमचा कट्टर कार्यकर्ता पण तुम्ही ऊसाचे बिल न दिल्याने माझा भाचा तडफडून मेला”

इतर क्राईम

Join WhatsApp

Join Now