अलीकडे कॉंग्रेसमधील नाराजी वाढत चालली आहे. अनेकदा पक्षातील नाराजीनाट्य चव्हाट्यावर देखील आलं आहे. अस असतानाच आता आणखी एका नेत्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. काँग्रेसचे आसाममधील ज्येष्ठ नेते रिपन बोरा यांनी रविवारी पक्षाच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
गेल्या ४५ वर्षांपासून पक्षासोबत राहिलेल्या रिपन बोरा यांनी पक्षातील अव्यवस्थेचं कारण सांगत राजीनामा दिला आहे. यासोबतच, आसाम काँग्रेसमधील लोकांनी भाजपासोबत हातमिळवणी केल्याचा देखील खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. यामुळे कॉंग्रेसला धक्का बसला आहे.
पक्षाला सोडचिठ्ठी देताना रिपन बोरा यांनी सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिले आहे. ते आपल्या पत्रात म्हणतात, ‘एकत्रपणे भाजपला रोखण्याऐवजी जुन्या पक्षातील लोक स्वार्थासाठी एकमेकांसोबतच भांडत आहेत. यामुळे भाजपला प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेण्याची संधी मिळाली असल्याच त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, गुजरात काँग्रेसचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा दिला आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक पटेल आणि काँग्रेस नेत्यांमध्ये तणाव असल्याच्या बातम्या येत होत्या.
तसेच हार्दिक पटेल यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या सर्व चर्चानंतर आज अखेर हार्दिक पटेल यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. ट्विट करत हार्दिक पटेल यांनी याबाबत माहिती दिली आहे.
हार्दिक पटेल आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, माझ्या या निर्णयाचे प्रत्येक सहकारी आणि गुजरातमधील लोक स्वागत करतील, मला विश्वास आहे की या पाऊलानंतर माझ्याकडून, मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.’
महत्त्वाच्या बातम्या
पेप्सीच्या ‘त्या’ एका चुकीमुळे देशात झाल्या होत्या दंगली, पेप्सीचे झाले होते करोडोंचे नुकसान
राज ठाकरेंची पुण्यातील सभा अचानक रद्द, तातडीने मुंबईला रवाना
४५० मातीच्या भांड्यांचा वापर करून तयार केले छत, उन्हाळ्यातही एसीची गरज भासत नाही
डोळ्यांवर चष्मा, पांढरी दाढी, ५७ व्या वर्षी टी-२० मध्ये पदार्पण; सचिनच्या आधीपासून खेळतोय वन-डे