Share

shivsena : रामदास आठवलेंना जबर धक्का..! बड्या नेत्याने बांधले हाती शिवबंधन, राजकीय समीकरण बदलणार?

Ramdas - Athawales

shivsena : एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेला मोठे खिंडार पाडले आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांनासोबत घेऊन भाजपशी हातमिळवणी करत राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र त्यानंतर राज्याच्या राजकारणातील राजकीय समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे.

विरोधी बाकावरील नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरल्याने विरोधकांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. राज्यात सत्तांतर होताच विरोधकांनी सत्तेत जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेत उभी फुट पडली आहे. यामुळे शिवसेनेला गळती लागल्याच चित्र पाहायला मिळत आहे. अशातच एक वेगळी बातमी समोर येत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या जवळच्या व्यक्तीने ठाकरे गटाला पाठिंबा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आठवले गटाचे माजी प्रदेश सचिव यांनी आठवले यांना रामराम ठोकला आहे. अन् त्यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून आता राजकीय समीकरण कशी बदलतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान,अहमदनगर येथील गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मातोश्रीवर हाती शिवबंधन बांधले आहे. तसेच गायकवाड हे आंबेडकरी चळवळीचे आणि बहुजन चळवळीतील जेष्ठ नेते आहेत. गायकवाड यांच्या पक्षप्रवेशामुळे अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now