मागील अनेक दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवनवीन कथा घेऊन चित्रपट येत आहेत. अनेक चित्रपटांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. काही दिवसांपूर्वीच एक चित्रपट आला होता. जो सर्व सामान्य लोकांच्या अगदी जवळ होता. या चित्रपटातील गाणे देखील सुपरहिट ठरले आहेत. तो म्हणजे म्हणजे ‘सैराट.’ सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता.
या चित्रपटातील गाणे देखील चाहत्यांना खूप आवडले होते. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. या चित्रपटातील आर्ची आणि परश्या ही जोडी खूप गाजली होती. नागराज मंजुळे यांनी आर्ची उर्फ रिंकू राजगुरू आणि परश्या उर्फ आकाश ठोसर या दोघांना सर्व सामान्यापासून सेलिब्रिटी बनवले. या दोघांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
यानंतर या दोघांना खूप प्रसिद्धी मिळाली. नागराज मंजुळे यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहे. काही दिवसांतच त्यांचा ‘झुंड’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटातील रिंकूचा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे.
https://www.instagram.com/p/CagnYMQpjZg/?utm_medium=copy_link
नुकताच ‘झुंड’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये रिंकूची पहिली झलकही पाहायला मिळत आहे. यामधील तिचा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. त्याचबरोबर रिंकूने तिचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करत. तिने लिहिले की, ‘नमस्ते मेरा नाम है मोनिका.’ तिच्या या लुकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
रिंकू ही ‘झुंड’ या सिनेमात मोनिकाची भूमिका साकारत आहे. तिचा या चित्रपटातील लूक काहीसा खेड्यातील तरूणीसारखा आहे आहे. काहीशी सावळी आणि उन्हाच्या झळा सोसलेली असा रिंकूचा हा लूक आहे. या लुकमधील रिंकुचे कपडे आणि तिच्या माथ्यावरील गोंदन हे लक्ष वेधून घेत आहे.
नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. यामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे देखील आहेत. या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत आहेत.‘झुंड’ या चित्रपटामध्ये रिंकूसोबत सैराट फेम परश्या म्हणजेच आकाश ठोसरही भूमिका साकारताना दिसणार आहे.