Share

Rinku Rajguru Photo : रिंकू राजगुरूचे साडीतील फोटो पाहून चाहत्यांना झाली स्मिता पाटीलची आठवण, म्हणाले..

Rinku Rajguru

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) नुकतीच सोशल मीडियावर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती साडी लूकमध्ये दिसत असून या लूकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. साडीतील तिचा अंदाज चाहत्यांना फारच आवडत आहे. तिच्या या लूकवर चाहते फिदा होत आहेत. तसेच या फोटोंवर अनेक कमेंट करत चाहते रिंकूचे आणि तिच्या लूकचे कौतुक करत आहेत.

रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एकूण तीन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या वेगवेगळ्या अदा पाहायला मिळत आहेत. पांढऱ्या रंगाच्या साडीवर गुलाबी रंगाची फुलं असलेली साडी रिंकूने नेसली आहे. त्यावर गुलाबी रंगाचा ब्लाऊज, कानात झुमके आणि माथ्यावर टिळा अशा लूकमध्ये रिंकू कमालीची सुंदर दिसत आहे. भर उन्हातील फोटो शेअर करत रिंकूने सोशल मीडियावरील तापमान वाढवले आहे.

फोटो शेअर करत रिंकूने लिहिले की, ‘खूबसुरती न सूरत में है न लिबास में… निगाहें जिसे चाहे उसे हसीन कर दें..!’ रिंकूच्या या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. अनेकजण तिच्या या फोटोवर हार्ट आणि फायरच्या इमोजी शेअर करत आहेत. तर एकाने तिच्या या फोटोवर कमेंट करत लिहिले की, ‘स्मिता पाटील इज बॅक..’ दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘खूप सुंदर लूक’.

https://www.instagram.com/p/CcM2b-PqMOf/

‘सैराट’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रिंकूला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे तिने प्रेक्षकांने मन जिंकून घेतले होते. ‘सैराट’मधील तिचा गावठी धडाकेबाज अंदाज प्रेक्षकांना खूपच भावला होता. त्यानंतर तिने ‘कागर’, ‘मेकअप’, ‘मनसु मल्लिगे’, ‘झुंड’ अशा चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘हंड्रेड’ या वेबसीरीजच्या माध्यमातून तिने डिजिटल विश्वातही पदार्पण केले.

रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. याद्वारे ती तिचे अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांशी संपर्कात राहत असते. तिच्याद्वारे शेअर करण्यात येणाऱ्या फोटोंमुळे ती फारच चर्चेत राहते. या फोटोंद्वारे रिंकू दिवसेंदिवस अधिकच ग्लॅमरस होत असल्याचे दिसून येत आहे. तिचे हे फोटो पाहून हीच का ती ‘सैराट’मधली आर्ची? असा प्रश्न चाहत्यांना पडत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
धोनीमुळे मला प्रेरणा मिळते कारण..; KGF फेम यशच्या वक्तव्याचं होतंय कौतुक, मानतो धोनीला आदर्श
‘माझं गाणं संपलं अन् पप्पांच्या डोळ्यात पाणी आलं’, आनंद शिंदेंच्या नातवाने सांगितला भावूक किस्सा
KGF फेम यश ‘या’ भारतीय खेळाडूला मानतो आपला आदर्श, म्हणाला, ‘मला त्याचं व्यक्तिमत्व खूप आवडतं’

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now