Share

Rinku Rajguru Photo : रिंकू राजगुरूच्या साडी लूकवर चाहते झाले फिदा; म्हणाले, क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो…

Rinku Rajguru

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) सोशल मीडियावरील आपल्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. या फोटोतील आपल्या वेगवेगळ्या लूकद्वारे ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. आताही रिंकूने तिचे काही लेटेस्ट फोटो इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. यामध्ये ती साडी लूकमध्ये दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. तसेच या फोटोंवर अनेक कमेंट करत तिचे भरभरून कौतुक करत आहेत.

रिंकूने (Rinku Rajguru) तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एकूण पाच फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या वेगवेगळ्या अदा पाहायला मिळत आहेत. पांढऱ्या रंगाच्या साडीवर गुलाबी आणि पिवळ्या रंगाची फुले असलेली साडी रिंकूने नेसली आहे. त्यावर साडीच्या बॉर्डरला मॅचिंग असणारा ब्लाऊज, गळ्यात नाजूक स्टोनचा हार, स्टोनचे कानातले आणि माथ्यावर टिळा अशा लूकमध्ये रिंकू कमालीची सुंदर दिसत आहे.

फ्लोरल प्रिंट असलेल्या या साडीवर रिंकूने सुंदर असा हेअरस्टाईलसुद्धा केला आहे. फोटो शेअर करत रिंकूने लिहिले की, ‘चमत्कार तेव्हा घडतो जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करण्यास सुरुवात कराल’. रिंकूच्या या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. अनेकजण तिच्या या फोटोवर हार्टच्या इमोजी शेअर करत आहेत.

https://www.instagram.com/p/Cchc_PJJl7j/

एका चाहत्याने रिंकूच्या (Rinku Rajguru) या फोटोवर कमेंट करत लिहिले की, ‘तुझ्यासारखा सुंदरींनी नेसण्यासाठीच साडींची निर्मिती करण्यात आली आहे’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘कडक आर्ची’. एकाने आर्चीची तुलना दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीशी करत लिहिले की, ‘वा श्रीदेवी लूक’. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, ‘क्या खूब लगती हो..बडी सुंदर दिखती हो..”

दरम्यान, ‘सैराट’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रिंकूला (Rinku Rajguru) अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे तिने प्रेक्षकांने मन जिंकून घेतले होते. सैराटमधील तिचा गावठी धडाकेबाज अंदाज प्रेक्षकांना खूपच भावला होता. त्यानंतर तिने ‘कागर’, ‘मेकअप’, ‘मनसु मल्लिगे’, ‘झुंड’ अशा चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘हंड्रेड’ या वेबसीरीजच्या माध्यमातून तिने डिजिटल विश्वातही पदार्पण केले.

https://www.instagram.com/p/CckFIxspIow/

रिंकू (Rinku Rajguru) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. याद्वारे ती तिचे अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांशी संपर्कात राहत असते. तिच्याद्वारे शेअर करण्यात येणाऱ्या फोटोंमुळे ती फारच चर्चेत राहते. या फोटोंद्वारे रिंकू दिवसेंदिवस अधिकच ग्लॅमरस होत असल्याचे दिसून येत आहे. तिचे हे फोटो पाहून हीच का ती सैराटमधली आर्ची? असा प्रश्न चाहत्यांना पडत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
आता सिनेमागृहातही वाजणार ‘भोंगा’; मनसेने मोठी घोषणा करत तारीखही सांगीतली
अनुपम खेरच्या सावत्र मुलासोबत सोहेलचे झाले होते कडाक्याचे भांडण, झाली होती मारामारी, वाचा किस्सा
ग्लॅमरस भूमिका साकारणाऱ्या ललिता पवार कशा झाल्या चित्रपटातील क्रुुर सासू? वाचा त्यांचा जीवनप्रवास

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now