Share

कोरोना काळात समाजसेवा करून प्रसिद्ध झालेला रिक्षावाला बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत

कोरोनामध्ये आपल्या ऑटोला अँम्ब्युलन्स बनवून प्रसिद्धीच्या झोतात येणारा भोपाळ मधील ऑटो ड्रायव्हर जावेद सध्या आणखी एका गोष्टींमुळे चर्चेत आला आहे. सध्या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, त्याने एका तरुण महिलेला बहीण बनवून फसवले आणि तिच्यावर बलात्कार केला.

संबंधित घटना ही मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ मधील आहे. ऑटो ड्रायव्हर जावेद हा येथील रहिवासी असून, कोरोना काळात त्याने केलेल्या समाजसेवेबद्दल तो प्रचंड चर्चेत आला होता. त्याने त्याच्या रिक्षाला ऍम्ब्युलन्स बनवून समाजसेवा केली होती. त्याच्या या कामाबद्दल मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी देखील कौतूक केले होते.

याच प्रसिद्ध जावेदबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याने भाडेकरू म्हणून त्याच्या घरात राहणाऱ्या एका महिलेला बहीण मानले आणि नंतर तिचा पती नसताना तिच्यावर बलात्कार केला. संबंधित महिलेने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.

भोपाळच्या ऐशबाग पोलिस स्टेशनचे प्रभारी मनीष राज भदौरिया यांनी सांगितले की, जावेदच्या घरी एक विवाहित जोडपे भाडेकरू म्हणून राहत होते. महिलेचा आरोप आहे की, जेव्हा ती घरी एकटी राहत असे तेव्हा जावेद तिचा विनयभंग करायचा. त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचाही आरोप महिलेने केला आहे.

पीडितेने हा प्रकार पतीला सांगितल्यावर पतीचे आरोपी जावेदसोबत भांडण झाले होते. भांडणानंतर दोघांनी जावेदचे घर सोडले आणि दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. जावेदने येथेही तिचा पाठलाग सोडला नाही आणि तिला त्रास देण्यास सुरुवात केली, असा आरोप महिलेने केला आहे.

महिलेने जावेदविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या तक्रारीच्या आधारे जावेदच्या विरोधात भादंवि कलम 376 (बलात्कार) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. जावेदने कोरोना काळात केलेली समाजसेवा जेवढ्या वेगाने व्हायरल झाली त्याहीपेक्षा अधिक त्याने महिलेवर बलात्कार केला ही बातमी अधिक व्हायरल झाली.

क्राईम

Join WhatsApp

Join Now