पीळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी जिममध्ये जाऊन घाम गाळावा लागतो यात शंका नाही. व्यायामशाळेत जाऊनच पीळदार शरीरयष्टी बनवता येते असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेणारे बॉडी बिल्डर्स व्यायामशाळेत जातात आणि कंबर कसून वजन उचलतात आणि घरी जाऊन पौष्टीक आणि सकस आहार घेतात.
केरळच्या एका रिक्षाचालकाने असं काही करून दाखवलं आहे की, तुम्हीही तोंडात बोटे घालाल. या चालकाने वयाच्या ५३ व्या वर्षीही जबरदस्त बॉडी बनवली आहे. मोठमोठ्या बॉडी बिल्डर्सला लाजवेल असं शरीर त्याने बनवलं आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
जबरदस्त शरीरयष्टी करून एक प्रकारे त्याने सगळ्यांना फिटनेसचा गुरूमंत्रच दिला आहे. केरळमधील फिटनेस इन्फ्लुएन्सर राजा सेखरन यांची बॉडी पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. कारण त्यांनी घरातच व्यायाम करून पीळदार शरीरयष्टी बनवली आहे.
तसेच घरातच व्यायाम करून पिळदार शरीरयष्टी कशी बनवता येते? याची माहितीही त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरून दिली आहे. तुम्ही त्यांचा व्हिडीओ जर पाहिला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील. त्यांनी इन्स्टाला १७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी फॉलो केलं आहे.
त्यांनी या व्हिडीओतून उत्तम शरीरयष्टी बनवण्यासाठी घरच्या घरी कोणते व्यायाम प्रकार करता येतील याची माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या वर्कआऊटचं नियोजन कसं आहे? ते रोज कसा वर्कआऊट करतात? ते कोणता डाएट फॉलो करतात? याची सर्व माहिती त्यांनी दिली आहे. फॅन्सी साहित्य, मशिन्स, ड्राय-फिट कपडे नसतानाही त्यांनी घरच्या घरी एकदम मस्क्युलर बॉडी बनवली आहे.
त्यांचा फिटनेस पाहून तरूण पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल यात शंका नाही. आजच्या तरूण पिढीला जिममध्ये जाऊन घाम गाळण्यात जास्त रस असतो. पण बरेच जण असे आहेत ज्यांच्याकडे जिममध्ये भरण्यासाठी पैसे नसतात. या कारणामुळे ते व्यायामच करत नाहीत. पण तुम्ही घरीही चांगल्या प्रकारे व्यायाम करू शकता याचे हे उत्तम उदाहरण आहे.