Share

‘मला वेड्यात काढू शकता पण देवाला नाही’, BCCI ने वारंवार दुर्लक्ष केल्याने खेळाडू संतापला

BCCI: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) T20 विश्वचषक 2022 नंतर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी आणि त्याच संख्येच्या सामन्यांच्या ODI मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. याशिवाय बांगलादेश दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीही संघ जाहीर करण्यात आला आहे. या दौऱ्यांसाठी अनेक ज्येष्ठ खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे, मात्र संघात निवड न झाल्याने युवा खेळाडूंनी सोशल मीडियावर आपली व्यथा मांडत भावनिक पोस्ट टाकल्या आहेत. BCCI, World Cup, Ravi Bishnoi, Umesh Yadav, Instastory, Team

2022 साली भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या रवी बिश्नोईकडे पुन्हा एकदा निवडकर्त्यांनी दुर्लक्ष केले आहे. चमकदार कामगिरी करणाऱ्या बिश्नोईची न्यूझीलंड दौऱ्याव्यतिरिक्त बांगलादेश दौऱ्यासाठी संघात निवड करण्यात आलेली नाही. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्याने लिहिले की, “कमबॅक नेहमीच धक्क्यापेक्षा मजबूत असतो.”

नुकतेच टीम इंडियात पुनरागमन केलेल्या उमेश यादवलाही आगामी दौऱ्यांमध्ये संघात स्थान मिळालेले नाही. त्याने आपली निराशा व्यक्त करत इन्स्टाग्रामवर पोस्टही केली आहे. उमेशने इन्स्टास्टोरी लिहिले आहे की, “तुम्ही मला मूर्ख बनवू शकता, परंतु देव तुम्हाला पाहत आहे हे समजून घ्या.”

भारतीय संघात निवड न झाल्याने डावखुरा फलंदाज नितीश राणाही निराश झाला आहे. नितीश राणाने त्याच्या आयपीएल कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात प्रवेश केला होता, परंतु पदार्पणानंतर तो केवळ 1 एकदिवसीय आणि 2 टी-20 सामने खेळू शकला. त्याने त्याच्या इन्स्टास्टोरीत लिहिले आहे की, ‘Hope, Hold on pain end.’

न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया:
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टिरक्षक), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया:
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टिरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

बांगलादेश वनडे मालिकेसाठी टीम इंडिया:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल

बांगलादेश कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव

महत्वाच्या बातम्या-
Sourav Ganguly : गांगुलीचा गेम झाला! BCCI अध्यक्षपद तर गेलेच पण ‘हे’ पदही मिळू दिले नाही; वाचा कोण आहे याचे सुत्रधार
वर्ल्ड कप विनर, डॉग लवर, मुलाच्या सिलेक्शनवरून वाद; वाचा BCCI चे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्याबद्दल..
BCCI च्या राजकारणामुळे उद्ध्वस्त झाली २२ वर्षाच्या स्टार खेळाडूची कारकिर्द, संघातून झाली हकालपट्टी

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now