Share

“… लक्षात ठेवा आमचे सरकार पडणारही नाही आणि मी झुकणारही नाही, जय महाराष्ट्र!”

sanjay raut

भाजपा नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर पुन्हा एकदा एक गंभीर आरोप केला. राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचं कंत्राट मिळवल्याचा असा आरोप सोमय्या यांनी केला.

याचाच धागा पकडत आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर निंदनीय आरोप होत आहेत. अपप्रचार करणाऱ्यांमुळे केंद्रीय यंत्रणांचा केवळ गैरवापर केला जात नसून त्यांची बदनामीही होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 

https://twitter.com/rautsanjay61/status/1492414343857672192?s=20&t=GnpHwyZqaxfsrbj0SrQvAw

 

ट्विटमध्ये राऊत म्हणतात, “गेल्या काही दिवसांपासून, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर निंदनीय आरोप होत आहेत. अपप्रचार करणाऱ्यांमुळे केंद्रीय यंत्रणांचा केवळ गैरवापर केला जात नसून त्यांची बदनामीही होत आहे. या अट्टल खोटारड्यांना लवकरच कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.” असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापसून विरोधकांकडून सतत ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे. याचबरोबर ठाकरे सरकार पडणार असल्याचे देखील विरोधक म्हणत आहेत. यालाच उत्तर देताना राऊत म्हणतात, “लक्षात ठेवा: आमचे सरकार पडणार नाही आणि मी झुकणारही नाही! जय महाराष्ट्र!”

 

काही दिवसांपूर्वीच सोमय्या पुणे दौऱ्यावर असताना ते पुणे महानगरपालिकेला भेट देणार होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना महापालिकेत जाण्यापासून रोखले. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. या धक्काबुकीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले.

त्याच झालं असं, सोमय्या महापालिकेच्या आयुक्तांना भेटायला आले होते. त्यावेळी पालिकेत भ्रष्टाचार होत असून त्याचे निवेदन देण्यासाठी शिवसैनिक पालिकेत आले होते. यावेळी पालिकेच्या जुन्या इमारतीत सोमय्या आल्यावर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली तसेच निवेदन देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान पुणे महापालिकेत आलेल्या किरीट सोमय्याची शिवसैनिकां सोबत धक्काबुक्की झाल्यानंतर राजकिय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्य म्हणजे याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सात ते आठ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला सोमय्यांसोबत भाजप नेते देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
शारिरीक संबंध न ठेवताच तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या घरात झाली प्रेग्नेंट? घरातील सदस्याचा खुलासा
दिग्गज उद्योगपती राहुल बजाज यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन, बराच काळ कर्करोगाने होते त्रस्त
हॉटेलच्या रूममध्ये ‘त्या’ अवस्थेत आईने मुलाला पाहिले गर्लफ्रेंडसोबत; आणि पुढे…, वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का
सागर कारंडे ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून पडला बाहेर? धक्कादायक खुलाश्याने मनोरंजन क्षेत्रात खळबळ

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now