shivsena : मुख्यमंत्री शिंदे तोंडावर आपटले! क्राईम ब्रँचकडून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा; वाचा काय आहे प्रकरण?

shivsena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या गटाला मोठा दिलासा मिळाल्याचं सकारात्मक वृत्त आता समोर आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेला भलेमोठे खिंडार पाडले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले, अन् उद्धव ठाकरेंना समर्थन देणारी अनेक शपथपत्र बनावट असल्याचा आरोप शिंदे गटाने केला.

त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या बनावट शपथपत्र प्रकरणी मुंबईच्या निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून मुंबई पोलिसांनी या प्रकरणात सूत्र हलवली आहे. गुन्हे शाखेने मुंबईत काही जणांची चौकशी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचच्या दोन अधिकाऱ्यांचे पथक तीन दिवस कोपरगावमध्ये ठाण मांडून होते. अनेक अंगांनी या प्रकरणाचा तपास करण्यात आला. अन् अखेर शिंदे गट तोंडावर आपटला. या सर्व चौकशीत ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी २०० जणांची क्राइम ब्रँचने तीन दिवस चौकशी करून शहानिशा केली. त्यानंतर शपथपत्रांसंदर्भात काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी मधुकर सानप ‌यांनी सांगितलं. यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निवडणूक आयोगाकडे बनावट कागदपत्र सादर केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. अखेर ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
Nilesh Lanke : “आमदार निलेश लंकेंनी कोरोना सेंटरच्या नावाखाली अफाट माया जमवली, आता त्या पैशातून…”
Umran Malik: उमरान मलिकला संघात न घेतल्याने ब्रेट लीने निवडकर्त्यांना लगावला टोला, म्हणाला, जगातील सर्वोत्तम..
Urvashi Rautela: ऋषभ पंतच्या नावाने सतत ट्रोल झाल्याने उर्वशी रौतेला झाली दुखी, म्हणाली, माझी कोणालाच…