Share

rekha : मी सेक्ससाठी वेडी आहे…; प्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या वक्तव्याने उडाली खळबळ

Rekha

rekha shocking statement on jitendra  | बॉलीवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रेखाने त्या काळात केवळ तिच्या चित्रपटांद्वारेच नव्हे तर तिच्या वक्तव्यांद्वारेही स्वतःची बोल्ड इमेज बनवली होती, जी प्रत्येकाच्या पचनी पडणे सोपे नव्हते. मी फक्त एक अभिनेत्री नाही तर कुप्रसिद्ध भूतकाळ असलेली आणि सेक्ससाठी वेडी असलेली अशी ओळख असणारी अभिनेत्री आहे, असे रेखाने स्वत:च सांगितले आहे.

रेखा नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. ते अनेकदा बोल्ड वक्तव्ये करत असतात. ज्यावेळी रेखा यांची सेक्ससाठी वेडी अभिनेत्री अशी इमेज बनली होती. त्यावेळी त्या एकाच वेळी २५ चित्रपटांचे काम करत होत्या त्याही डबल शिफ्टमध्ये. आजच्या अभिनेत्रींना शक्यच नाहीये.

त्याकाळी रेखा आणि जितेंद्र यांची जोडी खुप प्रसिद्ध होती. त्यांच्या दोघांची रोमान्सचीही खुप चर्चा असायची. अशात अनोखी अदा या चित्रपटाच्या सेटवर असं काही घडलं होतं की त्या ढसाढसा रडायला सुद्धा लागल्या होत्या. यासिर उस्मान यांनी रेखावर एक पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी रेखाचा एक किस्सा सांगितला आहे.

त्या पुस्तकात रेखा यांचं एक वक्तव्य आहे. त्या म्हणाल्या होत्या की, तुम्ही एखाद्या पुरुषाच्या तोपर्यंत जवळ जाऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्यासोबत सेक्स करत नाही. रेखा यांचं हे वक्तव्य तेव्हा खुप गाजलं होतं. त्या सेक्ससाठी वेड्या आहेत, अशी इमेज त्यांची बनली होती.

अशात निर्माता बीएन यांनी रेखा यांना त्यांच्या एक बेचारा या चित्रपटासाठी मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली होती. यामध्ये नायकाची भूमिका जितेंद्र साकारणार होते. त्यावेळी शुटींग दरम्यान रेखा आणि जितेंद्र यांची जवळीक वाढली होती. शिमलामध्ये शुटींग सुरु असताना रेखा आणि जितेंद्र रोमान्स करत होते, असे अनेक किस्सेही तेव्हा चर्चेत होते.

जितेंद्र यांच्याशी जवळीक वाढल्यानंतर त्या आपल्या अफेअरबद्दल बिंधास्त बोलायच्या. प्रेमात बुडाल्यामुळे त्या शुटींगच्या बाबतीत पुर्णपणे बेजबाबदार झाल्या. त्यांना अनोखी अदासाठी जितेंद्र यांच्या बरोबर पुन्हा कास्ट करण्यात आलं होतं. त्यावेळी जितेंद्र यांच्या आयुष्यात शोभा नावाच्या एका तरुणीने जागा बनवली होती. त्यामुळे रेखा आणि शोभा यांच्यातलं नातं फक्त टाईमपास म्हणून राहिलं होतं.

रेखा आणि जितेंद्र यांच्यात दुरावा वाढत होता. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद व्हायचे. त्यानंतर ज्युनियर कलाकारांसोबत बोलताना जितेंद्र यांनी रेखासोबत आपले नाते हे टाईमपास आहे, असा थेट उल्लेख केला होता. त्यावेळी रेखा या मेकअप रुममध्ये जाऊन ढसाढसा रडल्या होत्या.

पुस्तकात ते दोघे वेगळे झाल्यानंतर रेखाने दिलेल्या एका मुलाखतीचाही उल्लेख आहे. त्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की, मी त्या माणसाचा तिरस्कार करते, ज्याने मला प्रेम, रोमान्स आणि लग्नाबाबतची खोटी स्वप्न दाखवली होती. मी फक्त अभिनेत्री नाही तर एक कुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. जिची ओळख सेक्ससाठी वेडी असलेली बनून राहिलेली आहे.

महत्वाच्या बातम्या-
india : ‘या’ तीन खेळाडूंमुळेच भारतीय संघाला करावा लागला पराभवाचा सामना, शिखर करणार संघातून हकालपट्टी? 
rupali bhosle : रुपाली भोसलेच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी; गंभीर आजारामुळे अभिनेत्री रुग्णालायत दाखल
Hemangi kavi : सुट्टीत सगळे सेलिब्रिटी गोव्यात एन्जाॅय करत असताना ‘ही’ अभिनेत्री गेली गावच्या जत्रेला; भक्तीत झाली तल्लीन

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now