सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ अपलोड होत असतात. पण काही व्हिडिओ हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. महाराष्ट्रात सुद्धा असे काही लोक आहेत, ज्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होतात.
अशात बीड जिल्ह्यातील एका ऊस तोडणाऱ्या दाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ऊस तोडणी करणाऱ्या मनिषा हजारे आणि अशोक हजारे यांनी एक स्मार्ट फोन विकत घेतला होता. त्यामध्ये त्यांनी रील शुट करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी जवळपास ४०० व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केले होते.
त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला. रातोरात ते इतके फेमस झाले की, अनेकांच्या स्टेटसला या दाम्पत्याचा व्हिडिओ झळकू लागले. पण त्यांची ही प्रसिद्धीचं त्यांचं संकट बनली आहे. अशोक हजारे यांचं इंस्टाग्रामवर अकाऊंट हॅक करण्यात आले असून त्याच्यावरुन वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील अशोक हजारे आपल्या पत्नीसोबत व्हिडिओ बनवून रिल्स अपलोड करत होतं. त्यांनी केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल झाले. त्यामुळे ते एका रात्रीतच स्टार झाले. त्यांना राज्यभरात एक वेगळी ओळख मिळाली होती. ते सध्या कर्नाटकात ऊसतोडणीचे काम करत आहे. त्यामुळे तिथे देखील त्यांच्या चाहत्यांचा वर्ग बनला.
हजारे दाम्पत्याची प्रसिद्धी समाजकंटकांना बघवली गेली नाही. त्यामुळे त्यांचे अकाऊंट हॅक झाले. त्यानंतर समाजामध्ये चुकीचा मेसेज जाईल असे काही व्हिडिओ त्यावरुन पोस्ट करण्यात आले. त्यामुळे हजारे दाम्पत्याला मोठा धक्का बसला आहे. त्यांना अशामुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे.
अशात काही चांगले लोक त्यांच्या मदतीला धावून गेले. काही तरुणांनी त्यांच्या अकाऊंटवरील चुकीच्या पोस्ट हटवल्या. त्यामुळे हजारे दाम्पत्याचे टेंशन पण आता कमी झाले आहे. मदत केल्यानंतर हजारे दाम्पत्यांनी सुद्धा त्या लोकांचे आभार मानले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करु नका’; संभाजी भिडेंचे सरकारला आवाहन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे राष्ट्रवादीत उभी फुट; अजित पवारांसह बड्या नेत्यांची तातडीने धावाधाव
“जेव्हा ‘तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा..’, शुबमन गिलने सामन्यानंतर ठेवला देशभक्तीचा आदर्श, ‘या’ वक्तव्याने जिंकली मने