महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी सध्या घडून येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले होते. परंतु आज संध्याकाळी ५० आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Rebels upset by developments in Supreme Court; Shinde called an urgent meeting of all 50 MLAs)
५० आमदारांच्या या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांवर चर्चा होणार असल्याचे बोलले जाते. परंतु सध्या परिस्थिती पाहता आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून होत असल्याचे बोलले जाते.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजून कोणतीही स्पष्टता नाही. या पार्श्वभूमीवर विस्ताराबाबत सुद्धा काही वेगळी माहिती या बैठकीत मुख्यमंत्री सर्व आमदारांना देतात काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काल एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना विश्रांती घेण्यास डॉक्टरांनी सांगितले तर, दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले सर्व प्रशासकीय ठरलेले कार्यक्रम रद्द करून तातडीने दिल्लीला रवाना झाले.
उपमुख्यमंत्री फडणवीस पक्षश्रेष्ठींशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच महत्त्वपूर्ण बोलणी करण्यासाठी गेले असल्याचे सांगितले जाते. आता आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ५० आमदारांची जी बैठक घेत आहेत. त्या बैठकीमध्ये काय महत्त्वपूर्ण चर्चा होते? याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीला लागत असलेला वेळ, त्यामुळे लांबत जाणारा मंत्रिमंडळ विस्तार, निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाने पक्षचिन्हाबाबत केलेल्या अर्जावर कोणताही निकाल लगेच देऊ नये. अशी केलेली सूचना, या सर्व गोष्टींमुळे शिंदे गटातील आमदार अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या-
Bribe: छापा पडला तर घेतलेली लाच घेऊन पळाला अधिकारी, व्हिजिलेन्स टीमने पाठलाग करून पकडले
NCP: पंढरपूरात राजकीय भूकंप; शहाजी पाटलांनी फोडला शरद पवारांचा विश्वासू नेता
Shivsena: ‘मोगलांना सगळीकडे संताजी धनाजी दिसायचे तसे गद्दारांना उद्धवजी आणि आदित्य ठाकरे दिसताहेत’