Share

बंडखोर आमदारांच्या बायका त्यांना सोडून जातील, त्यांच्या मुलांनाही बायका मिळणार नाहीत’

eknath shinde

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. जवळपास ५० समर्थक आमदारांसह ते गुवाहाटीत तळ ठोकून बसले आहेत. कट्टर शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी करत आहेत. सध्या एकनाथ शिंदे आणि शिवसेना असे दोन गट पडलेले दिसत आहेत.

राज्यात अशी स्थिती असताना आता शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, जे बंडखोर आमदार आहेत, त्या आमदारांच्या बायका सोडून जातील, त्यांच्या मुलांना बायको मिळणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

संतोष बांगर माध्यमांशी बोलत होते. म्हणाले, शिवसेनेला भगदाड पाडून बंडखोरी केलेल्या आमदारांना त्यांच्या बायका सोडून जातील. त्यांच्या मुलांना कोणीही बायका देणार नाही, असं वादग्रस्त विधान बांगर यांनी केल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तसेच म्हणाले, छगन भुजबळ गेले, नारायण राणे गेले, गणेश नाइक गेले पण शिवसेनेला काहीही फरक पडला नाही. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, त्यानंतर त्यांच्या अंगावर कधी विजयचा गुलाल पडला नाही. हा शाप शिवसेना कार्यकर्त्याचा आहे, असे संतोष बांगर म्हणाले.

बंडखोर आमदार येतील तेव्हा सोडू नका. त्यांचं स्वागत सडके टमाटे आणि अंडे फेकून करा, बंडखोरी केल्याने त्यांचं तोंड आधीच काळं झालं आहे, असा टोला बांगर यांनी लगावला आहे. बंडखोरांपैकी बरेच आमदार आपल्या संपर्कात आहेत. काय करायचं काही कळत नाही. फाशी घ्यावीशी वाटतेय, असं ते सांगत आहेत, असे संतोष बांगर म्हणाले.

दरम्यान, कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मुंबई येथून परत आल्यानंतर मतदारसंघात दौरा सुरू केला आहे. शिवसेना कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद सुरू केला आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरामध्ये आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत आज शिवसेना कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now