Share

Uddhav Thackeray: बंडखोर आमदाराच्या बहिणीने उद्धव ठाकरेंना दिली हजारो शपथपत्र; म्हणाल्या, ठाकरे कुटुंबावर…

uddhav thackeray vaishali suryavanshi

rebal mla sister meet uddhav thackeray | राज्यात सध्या शिंदे-भाजर सरकार स्थापन झालेले आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश घेतला. आमदार किशोर पाटील यांनी देखील शिवसेनेला आव्हान देत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. पण आता ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे.

आमदार किशोर पाटील यांना त्यांच्या घरातूनच एक आव्हान मिळाले आहे. किशोर पाटील यांची बहिण वैशाली सुर्यवंशी यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी हजारो शपथपत्र उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादर केली आहे.

निर्मल उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आर ओ पाटील यांची कन्या वैशाली सुर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. आधी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलक लावत आपण एकनिष्ठ असल्याचे जाहीर केले होते.

आता बुधवारी वैशाली सुर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी हजारो शिवसैनिकांच्या सह्यांचे शपथपत्र उद्धव ठाकरे यांना दिले आहे. त्यामुळे आता किशोर पाटील यांच्या राजकारणाला त्यांच्या घरातूनच आव्हान मिळत असल्याचे दिसून येत आहे.

वडिलांनी दिलेल्या शिवकवणूकनुसारच आपण वागणार आहोत. ठाकरे कुटुंबावर आपली श्रद्धा आहे. त्यानुसार आणि वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी ठाकरे कुटुंब व मातोश्रीसोबतच आपण राहणार असल्याचे वैशाली सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.

बुधवारी वैशाली यांनी शेकडो शिवसैनिकांसह मातोश्री गाठली होती. यावेळी त्यांनी हजारो शिवसैनिकांचे शपथपत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली आहे. तसेच यावेळी वैशाली सुर्यवंशी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळास भेट देऊन अभिवादन सुद्धा केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Pune: पुण्यातीस एसटी चालकाने स्वतः मृत्यूला कवटाळले पण गाडीतील २५ प्रवाशांचे प्राण वाचवले
मराठी लोकं साऊथचे सिनेमे पाहायला सिनेमागृहात जातात पण मराठी चित्रपट का पाहत नाहीत? महेश मांजरेकरांचा सवाल
Shivsena: ‘मोगलांना सगळीकडे संताजी धनाजी दिसायचे तसे गद्दारांना उद्धवजी आणि आदित्य ठाकरे दिसताहेत’

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now