Share

eknath shinde : …म्हणून शिवसेनेची जागा असूनही शिंदेंच्या गटाला मिळाली नाही अंधेरीची उमेदवारी

eknath shinde and devendra fadanvis

reason behind eknath shinde candidate not in andheri election  | सध्या राज्यभरात अंधेरी पुर्वची निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होणार आहे. ही निवडणूक ३ नोव्हेंबरला होणार आहे. यासाठी ठाकरे गटाकडून रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

गेल्या दोन विधानसभा निवडणूकांमध्ये शिवसेनेने या ठिकाणी आपला झेंडा रोवला आहे. असे असतानाही एकनाथ शिंदे यांच्या गटाने इथली उमेदवारी भाजपला कशी दिली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. भाजपला ही उमेदवारी देण्याची सहा प्रमुख कारणं आहेत.

पहिलं कारण म्हणजे नवीन चिन्ह. शिवसेनेचा धनुष्यबाण सध्या गोठवण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आले आहे. कमी काळात लोकांपर्यंत हे चिन्ह पोहचवणे कठीण आहे. पण भाजपचे कमळ हे घराघरात पोहचले आहे. त्यामुळेच या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडण्यात आला आहे.

शिंदे गट आणि भाजपला पाहता भाजपच्या मुरजी पटेल यांच्याबाजूने जास्त मतदार आहे. या मतदार संघात मराठी मतदारांसोबतच मुस्लिम, मारवाडी, गुजराती, ख्रिश्चन हे सुद्धा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शिंदे गटाला त्या सर्वांपर्यंत पोहचणे खुप कठीण झाले असते.

तिसरं कारण म्हणजे सहानुभूतीची लाट. रमेश लटके यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांनाच उमेदावारी दिली आहे. त्यामुळे मतदारांचा विचार केला असता लटकेंच्या बाजूने झुकते माप आहे. तसेच त्यांचा उमेदवारीचा मार्गही मोकळा झाला होता. त्यामुळे त्या शिंदे गटात येणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे शिंदेंनी माघार घेतली.

भाजपचे मुरजी पटेल हे सुद्धा गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी निवडणूक लढवत आहे. त्यामुळे या मतदार संघात त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे शिंदे गटाने आपला नवा उमेदवार उतरण्याऐवजी भाजपच्याच नेत्याला उमेदवारी दिली असल्याची चर्चा आहे.

पाचवे कारण म्हणजे युतीमध्ये भाजपच प्रमुख. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळालं असलं तरी राजकीय गोष्टींमध्ये भाजपच पुढे असल्याचे दिसते. त्यामुळे यावेळी भाजपने शिंदेंच्या नेत्याला उमेदवारी न देता अंधेरी मतदार संघात आपला उमेदवार उभा केला आहे.

सहावे कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांची बंडानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे शिंदे गटाचा उमेदवार उतरवला असता, तर ती शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत झाली असती. त्यामुळे काही गोष्टींचा विचार केला असता शिंदेंना ही निवडणूक जिंकणं कठीण गेलं असतं. त्यामुळे पराभव टाळण्यासाठी शिंदेंनी हा निर्णय घेतलाचं दिसतं.

महत्वाच्या बातम्या-
Amit Thackeray : ….नाहीतर मी राजकारणात आलोच नसतो; अमित राज ठाकरे असं का म्हणाले
Death : ब्रेकिंग! पणन महासंचालक घोरपडेंचा मृतदेह दोन दिवसांनी नीरा नदीपात्रात सापडला; हत्येचं गुढ कायम
shivsena : रामदास आठवलेंना जबर धक्का..! बड्या नेत्याने बांधले हाती शिवबंधन, राजकीय समीकरण बदलणार?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now