reason behind bcci remover selectors team | टी २० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा दारुण पराभव झाला. त्यामुळे भारतीय संघाचे टी २० वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पुन्हा भंगले आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीची हकालपट्टी करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघ खुपच निराशाजनक कामगिरी करताना दिसून येत आहे. त्यामुळे बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाच्या खराब कामगिरीसोबतच संघातील सदस्यांसोबतही निवड समितीचे वाद होत होते.
अशात वर्ल्डकप झाल्यानंतर बीसीसीआयने संपूर्ण समितीचं बरखास्त केली आहे. त्यामुळे आता अनेक मुद्दे समोर आले आहे. निवड समितीचे विराट कोहली आणि द्रविडसोबतच्या वादही समोर आले आहे. निवड समितीचा पहिला वाद विराट कोहलीसोबत झाला होता.
विराट कोहलीनं टी २० वर्ल्डकपआधीच कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता.त्यानंतर कोहलीकडून वनडेच्या संघाचे कर्णधारपदही काढून घेण्यात आले होते. पुढे कोहलीने स्वत:हून कसोटीचे कर्णधारपद सोडले. त्यावेळी कोहलीने निवड समितीवर अनेक आरोप केले होते.
तसेच राहूल द्रविडसोबतही निवड समितीचा वाद झाला होता. प्रॅक्टिस सेशनमध्ये निवड समिती सतत हस्तक्षेप करत होती. त्यामुळे राहूल द्रविड नाराज होते. आयपीएल २०२२ मध्ये तर राहूल द्रविड आणि चेतन शर्मा यांच्यात वाद झाल्याचेही पाहायला मिळाले होते.
तसेच निवड समितीने २०२१ ते २०२२ टी वर्ल्डकपपर्यंत अनेक कर्णधार बदलले. जवळपास सहावेळा कर्णधार बदलण्यात आले. त्यामुळे चुकीचा संदेश जात होता. रोहित शर्मा संघाचा कर्णधार बनल्यानंतर भारतीय संघाने अनेक मालिकांमध्ये विजय मिळवला. पण एकाही मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही.
विराट कोहली कर्णधार असतानाही भारतीय संघाला एकाही मोठ्या स्पर्धेत विजय मिळवता आला नव्हता. आता रोहित कर्णधार झाल्यानंतरही तोच मुद्दा उचलला जात आहे. निवड समितीने तिन्ही फॉरमॅटमध्ये रोहितला कर्णधार केलं. पण आता बीसीसीआय वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. २०२४ चा वर्ल्डकप जिंकण्यासाठी बीसीसीआय प्रत्येक फॉरमॅटमध्ये वेगळा कर्णधार असेल अशी घोषणा करु शकते.
महत्वाच्या बातम्या-
ankit joshi : कडक सॅल्यूट! मुलीसाठी सोडले लाखोंच्या नोकरीवर पाणी: म्हणाला, वडील होणं हे पण एक प्रमोशन
‘सुर्याच्या आजच्या इनिंगला जगात तोड नाही’; प्रतिस्पर्धी कर्णधार विलियम्सनही झाला नतमस्तक
suryakumar yadav : न्युझीलंडमध्ये आलं सूर्याचं वादळ, नाबाद शतक ठोकत भारताला मिळवून दिला दणदणीत विजय






