Share

शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदेंनाच का मिळाले? ‘हे’ भलतेच पाच मुद्दे आयोगाने घेतले विचारात

Eknath Shinde

निवडणूक आयोगाच्या निर्णयाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिले आहे. शिंदे यांना चिन्ह आणि नाव दिल्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. आता आपण निवडणूक आयोगाने नक्की काय निर्णय दिला आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेवर भाष्य केलं होतं. शिवसेनेची जी घटना आहे ती लोकशाहीला धरुन लिहीलेली घटना नाहीये, असे मत निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या शिंदेंच्या बाजूने निर्णय देण्यामागे हे एक कारण असल्याचे म्हटले जात आहे.

ठाकरे गटाने पक्षात काही पदाधिकाऱ्यांची निवड केली होती. त्या निवडीवरही निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. लोकशाही पायदळी तुडवून ठाकरेंनी पक्षात पदाधिकाऱ्यांची कोणत्याही निवडणूकीशिवाय निवड केल्याचे आयोगाने म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव देण्यात येत आहे, असा निर्णय निवडणूक आयोगाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत दिला आहे. शिवसेना पक्षाच्या घटनेत २०१८ मध्ये सुधारणा करण्यात आल्या त्याबाबत निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आलेली नाही, असे आयोगाने म्हटले आहे.

तसेच शिवसेनेची घटना ही लोकशाहीला धरुन नाही. शिवसेनेच्या मूळ घटनेतील लोकशाहीविरोधातील नियम १९९९ मध्ये आयोगाने स्विकारले नव्हते. ते नियम सुद्धा न सांगता त्यामध्ये ऍड करण्यात आले आहे, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

दरम्यान, एकनाथ शिदे यांना शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्यामुळे त्यांच्या गटात आनंदाचे वातावरण आहे. एकनाथ शिदेंनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, सत्याचा विजय झाला आहे. पण हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांनी एका वाक्यातच काढली निवडणूक आयोगाच्या निकालाची हवा अन् वाढले भाजपचे टेंशन
उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव आणि चिन्ह परत मिळू शकते? जाणून घ्या कायदेतज्ज्ञ काय म्हणाले…
शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now