बॉलिवूडची अतिशय क्यूट अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट आजकाल थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) आहेत, ज्यांनी वास्तविक जीवनातील गंगूबाईच्या जीवनावर आधारित हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाला रिलीज होऊन एक आठवड्याहून अधिक काळ लोटला असून चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.(Real Gangubai Kathiawadi’s youth photo goes viral)
‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील आलिया भट्टच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटाला आणि आलियाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट हुसैन जैदी याचं पुस्तक मुंबईच्या माफिया क्वीन्सच्या जीवनावर आधारित आहे. तसेच ही गोष्ट बहुतेकांना माहीत नाही. चित्रपटात आलिया भट्ट व्यतिरिक्त अजय देवगण, पार्थ समथान, शंतनू माहेश्वरी आणि सीमा पाहवा मुख्य भूमिकेत आहेत.
गंगूबाई काठियावाडी गुजरातच्या काठियावाडमधील एक साधी मुलगी होती. चित्रपटात अभिनेत्री बनण्याच स्वप्न घेऊन मुंबईला आली. जी पुढे मुंबईची माफिया क्वीन म्हणून ओळखली जाऊ लागली आणि नंतर कोठावाली बनली. गंगूबाई काठियावाडी यांचा जन्म 1939 साली गुजरातमध्ये झाला.
तुम्ही रील लाइफ गंगूबाईला मोठ्या पडद्यावर पाहिलं आणि आवडलीही असेल, पण खऱ्या आयुष्यात गंगूबाई कशा दिसत होत्या हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला त्याचे खरे फोटो दाखवणार आहोत, जे पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू येईल. गंगूबाईंचे खरे नाव गंगा जगजीवनदास काठियावाड होते. डॉन झाल्यानंतर त्यांना गंगूबाई म्हणून ओळखले जाऊ लागले.
गंगूबाई खऱ्या आयुष्यात खूप सुंदर होत्या. विशेष म्हणजे तिचा फोटो व्हायरल झाल्यानंतर लोक आलियाचे सौंदर्य फिके पडल्याचे सांगत आहेत. गंगूबाईचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो ब्लॅक अँड व्हाईट आहे, परंतु फोटो पाहून तुम्हाला कल्पना येईल की ती किती सुंदर दिसत होती. हा फोटो समोर आल्यानंतर लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
गंगूबाईचा हा फोटो बॉलिवूड स्टोरी नावाच्या पेजने शेअर केला आहे. फोटोत गंगूबाई खूप सुंदर दिसत आहे. या चित्रपटात आलियाला तिच्या कॉपीचा अवतार देण्यात आला आहे. कपाळावर लाल मोठी टिकली आणि गालावर काळी खूण गंगूबाईंच्या चेहऱ्यावर दिसून येते. चित्रपटात गंगूबाई बनलेली आलिया भट्ट हिरोईन बनण्याची स्वप्ने दाखवून विकली जाते. यानंतर, ती तिच्या नवीन आयुष्यात येणारी आव्हाने स्वीकारते आणि 4000 महिला आणि मुलांसाठी लढते.
महत्वाच्या बातम्या-
तेव्हा लहाणपणी लग्न व्हायची तुमचं अजून झालं नाही, राज ठाकरेंचा कोश्यारींना टोला
राज्यपालांनी लोकशाहीचा गळा घोटला; आघाडी विरोधात कोर्टात जाणाऱ्या भाजपलाच कोर्टाने झापले
PHOTOS: या आहेत भोजपुरीच्या टॉप १० ग्लॅमरस अभिनेत्री; सनी लिओनी, नोरा फतेहीही पडतील फिक्या
सोनाक्षी नाही, तर ‘या’ अभिनेत्रीशी ठरलं होतं सलमानचं लग्न, पत्रिकाही छापल्या होत्या; पण पुढे