Share

‘पतीच्या रक्ताने माखलेला भात जबरदस्तीने पत्नीला खाऊ घातला’, काश्मिरी पंडितांचा किस्सा वाचून काळीज फाटेल

काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडावर आधारित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांसारखे कलाकार आहेत. चित्रपट पाहून चित्रपटगृहातून बाहेर पडणाऱ्यांना अश्रू आवरता येत नाहीत, असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.(Reading the case of Kashmiri Pandits will break your heart)

चित्रपट पाहायला आलेल्या लोकांचे म्हणणे आहे की, बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच कोणत्याही दिग्दर्शकाने असे धाडस दाखवले आणि 32 वर्षांपूर्वी काश्मिरी हिंदूंवर झालेल्या क्रूरतेचे सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आज आम्ही तुम्हाला काश्मिरी पंडितांसोबत घडलेल्या अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या ऐकून तुमचे हृदय हेलावेल. गिरिजा टिक्कू आणि बी.के गंजू या शिक्षकांसोबत घडलेली अमानवी घटना ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल.

सुनंदा वशिष्ठ यांनी काश्मिरी पंडित बी.के गंजू यांच्यासोबत घडलेल्या अमानवी घटनेबद्दलही सांगितले. सुनंदा वशिष्ठ सांगतात की बी.के.गंजू सारख्या लोकांना शेजाऱ्यांवर विश्वास ठेवण्याच्या  बदल्यात फक्त आणि फक्त धोका मिळाला आहे. दहशतवाद्यांनी बी.के गंजू यांना कंटेनरमध्येच गोळ्या घातल्या. बीके गंजूवर गोळ्या झाडल्यानंतर दहशतवाद्यांनी पंडिताच्या पत्नीला त्याच्या रक्ताने माखलेला भात खाऊ घातला होता.

खर पाहता काश्मीर खोऱ्यात हिंदूंना मारण्याची प्रक्रिया 1989 पासूनच सुरू झाली होती. सर्वप्रथम पंडित टिकलाल टपलू यांची हत्या करण्यात आली. श्रीनगरमध्ये टपलूवर खुलेआम गोळ्या झाडण्यात आल्या. टिकलाल टपलू हे काश्मिरी पंडितांचे महान नेते होते. हे आरोप जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या दहशतवाद्यांवर करण्यात आले, मात्र कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

सुनंदा वशिष्ठ यांच्या म्हणण्यानुसार, बांदीपोरामधील शिक्षिका गिरिजा टिक्कू यांचे अतिरेक्यांनी सर्वप्रथम अपहरण केले होते. शिक्षिका गिरिजा टिक्कूवर दहशतवाद्यांनी सामूहिक बलात्कार करून तिचे दोन तुकडे केले. शिक्षिका गिरिजा टिक्कू यांच्यासोबत जी गोष्ट घडली किंवा ज्यांनी हे केले त्यामध्ये गिरीजा टिक्कू यांनी शिकवलेल्यांचाही समावेश होता.

महत्वाच्या बातम्या-
Top 5 South Gossips of the Day: २ दिवसात राधे श्यामचा तब्बल एवढ्या कोटींचा गल्ला, RRR चे महत्वाचे सीन्स लीक
१७ वर्षांत ३९९ काश्मिरी पंडित मारले पण १५००० मुस्लिम देखील मारले गेले , काँग्रेसच्या वादग्रस्त ट्विटनंतर लोक भडकले
नोकरीची चिंता सोडा, एकदाच लावा हे रोप, आयुष्यभर कमवा लाखो रुपये
विवेक अग्निहोत्रींना याचे परिणाम कोणत्या ना कोणत्या प्रकारे भोगावे लागतील, मनोज मुंतशिरचं ट्विट चर्चेत

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now