आयपीएल (IPL) २०२२ च्या महाअंतिम सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात मोठी लढत पाहायला मिळाली. त्यात सामना जिंकत २०२२ च्या आयपीएल (IPL) कपवर गुजरात टायटन्सने आपले नाव कोरले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वामुळे पहिल्यांदाच आयपीएल मोसमात सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सने विजेतेपदाला गवसणी घातली. मोठ्या रकमेची बक्षीस यावेळी अनेक खेळाडूंना देण्यात आली. त्या लिस्टमध्ये सर्वात वरच्या स्थानावर ६ पुरस्कार जिंकणारा जॉस बटलर हा खेळाडू आहे. (hardik pandya, joss butler, gujarat titans, ipl2022, rajasthan royals )
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत राजस्थान रॉयल्सने फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानकडून खेळताना यशस्वी जैस्वाल (२२), संजू सॅमसन (१४), देवदत्त पडिक्कल (२), हे झटापट बाद झाले. जॉस बटलरनी सर्वाधिक ३९ धावा त्यांनी केल्या. पूर्ण खेळ करून अवघ्या १३१ धावांचे लक्ष त्यांनी गाठले. प्रतिउत्तरात हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सकडून वृद्धीमन साहा (५), मॅथ्यू वेड (८), धावा करून बाद झाले. शुभमन गिलला २ वेळा जीवनदान मिळाले. शिमरोन हेटमायरकडून त्याचा झेल सुटला. त्यानंतर शुभमन आणि हार्दिकच्या जोडगोळीने ५३ चेंडूत ६३ धावा करत मोठी भागीदारी करून गुजरात टायटन्सला जेतेपदाजवळ आणले.
२००८ च्या विजेते पदानंतर तब्बल १४ वर्षांनी राजस्थान रॉयल्सने उपांत्य फेरी गाठली होती, परंतु त्यांचे विजेते पदाचे स्वप्न भंगले आणि नव्या आलेल्या गुजरात टायटन्सकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. परंतु कधीही हार न मानणाऱ्या संजू सॅमसनच्या कमाल खेळीची आणि नेतृत्व कौशल्याची चर्चा क्रिकेट विश्वात होत आहे.
आयपीएल २०२२ च्या विजेत्या गुजरात टायटन्सला २० कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. तसेच उप विजेता ठरलेल्या राजस्थान रॉयल्सला १२.५ कोटी रुपये दिले गेले. राजस्थान रॉयल्सचा यजुर्वेंद्र चहल हा गोलंदाज पर्पल कॅपचा मानकरी ठरला. त्याने या मोसामातील सर्वाधिक २७ विकेट घेतल्या. त्याला १० लाखांचे बक्षीस मिळाले. गुजरात टायटन्सकडून खेळणारा जॉस बटलर हा फलंदाज ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. त्याने या मोसमातील सर्वाधिक ८६३ धावा केल्या. त्याला १० लाख रुपये बक्षीस स्वरुपात दिले गेले.
most valuable player म्हणुन जॉस बटलरला १० लाख रुपये मिळाले सर्वाधिक षटकार (४५ ) ठोकल्यामुळे १० लाख, powar player of the season म्हणून १० लाख, सर्वाधिक चौकार (८३) ठोकल्याने १० लाख, game changer of the season म्हणून १० लाख, असे ६ पुरस्कार जॉस बटलरला मिळाले.
emerging player of the year हा किताब उम्रान मलिक या खेळाडूला मिळाला. त्याने २२ विकेट्स घेतल्या होत्या. त्याला २० लाख रुपये बक्षीस स्वरुपात रक्कम मिळाली. दिनेश कार्तिक हा यावर्षी बंगळूरू संघाकडून खेळला. त्याने super stiker of the season हा किताब पटकावला. त्याला १० लाख रुपये मिळाले. तसेच टाटा पंच ही ४ चाकी गाडी त्याला बक्षीस म्हणून देण्यात आली.
fastest delivery of the season हा किताब ल्युकी फर्ग्युसनला मिळाला. त्याला १० लाख रुपये रक्कम त्यासाठी बक्षीस मिळाली. catch of the season हा किताब एव्हीन लुईसला मिळाला. त्यासाठी त्याला १० लाख रुपये रक्कम बक्षीस मिळाली. अशा प्रकारे भरपूर पैसे आणि बक्षिसांची लयलूट आयपीएल २०२२ या मोसमात झाली.
महत्वाच्या बातम्या
जे झालं ते झालं आता कशाला काढता, नवीन काहीतरी करा, ज्ञानवापीवरून अजित पवार संतापले
‘…असं केल्याने तुम्ही प्रगतीच्या दिशेने जाऊ शकत नाही,’ ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या वानखेडेंचे ट्विट चर्चेत
भाजपने कोल्हापूरात उमेदवार उतरवल्यानंतर राऊत संतापले, भाजपनं स्वतःच्या स्वार्थासाठी…
ना ओटीपी आला, ना मेसेज, तरी पोलिस कर्मचाऱ्याच्या खात्यातून गायब झाले ३१ लाख, वाचा काय घडलं…