आपल्या गाण्यांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर (lata mangeshkar) आता आपल्यात नाहीत. आवाजाने सर्वांची मने जिंकणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज कायमचा नि:शब्द झाला आहे. रविवारी सकाळी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले. रविवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. (lata mangeshkar last video)
त्यांच्या निधनानंतर सोशल मिडियावर अनेक फोटो, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लतादीदी आजारी होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच दरम्यान लता मंगेशकर यांचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे. आता त्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य समोर आले आहे.
लता दीदीचा व्हिलचेअरचा व्हिडिओ ३१ जानेवारी २०२२ चा असून ब्रीच कँडी रूग्णालयातील आहे. लता दीदींचा हा शेवटचा व्हिडीओ आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लता दीदी यांच्या शरीरातील अनेक अवयव काम करण बंद झालं. त्यावेळेचा हा व्हिडीओ आहे.
https://twitter.com/i_am_nawal/status/1490363237623537665?s=20&t=EIjOtJc2k99hnpQNNjn_5A
याबाबत स्वतः डॉ प्रतीत समदानी यांनी माहिती दिली आहे. तसेच या व्हिडीओमध्ये डॉ. प्रतीत समदानी त्यांना कशा आहात दीदी? गुड..? असा प्रश्न विचारत आहेत. मात्र लता दीदी त्या प्रश्नाला उत्तर देताना दिसत नाहीत. सध्या हा व्हिडिओ पाहून अनेकांना अश्रु अनावर झाले आहेत.
तसेच ८ जानेवारी रोजी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली म्हणून ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण त्यापूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लतादीदी कोणाचा तरी आधार घेऊन चालताना दिसत आहेत.
https://twitter.com/DivyeshTrivedi_/status/1490339432456622085?s=20&t=J-uYre8dBHJyjeXlDp-SAw
दोन महिलांनी लता मंगेशकर यांना पकडलं असून त्या हळू चालत असल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे. लता दीदींना दोघींनी धरलं आहे. लता दीदींचा हा घरातील व्हिडीओ असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाची बाधा झाल्यामुळे लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र त्यानतंर त्यांची प्रकृती गंभीर होत गेली आणि अखेर ६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. याचबरोबर लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी अनेक मान्यवर शिवाजी पार्क येथे दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
महत्त्वाच्या बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कॉंग्रेसवर गंभीर आरोप; ‘देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र कॉंग्रेस जबाबदार’
नमाज पढून शाहरुख खानने लतादीदींच्या पार्थिवावर फुंकर मारली; लोकांनी मात्र काहीतरी वेगळंच समजलं…
JIOच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी: दोन दिवस सेवा ठप्प झाल्याने कंपनी ग्राहकांना देणार ‘हे’ मोठे गिफ्ट
आपण इतक्या खालच्या पातळीवर आलोय की.., शाहरूखला ट्रोल करणाऱ्यांवर उर्मिला संतापली