Share

पहा अंबानींच्या सुनेचा विवाहातील ‘रॉयल लूक’, लेहंगा आणि ज्वेलरीची किंमत ऐकून तुमचे डोळे फिरतील

ambani

बिझनेसमन अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानीचा नुकताच विवाहसोहळा पार पडला आहे. 20 फेब्रुवारी रोजी त्याने कृशा शाहसोबत लग्न गाठ बांधली आहे. या शाली लग्नसोहळ्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

जेवढी चर्चा या विवाह सोहळ्याची झाली तेवढीच चर्चा अंबानींच्या सुनेचा विवाहातील ‘रॉयल लूक’ची देखील झाली. कृशा शाह यांनी लग्नासाठी अनामिका खन्नाच्या कलेक्शनचा लेहंगा परिधान केला होता. या लेहंगाची किंमत वाचून तुमचेही डोळे पांढरे पडतील.

मिळालेल्या माहितीनुसार, कृशा शाहच्या या सुंदर लेहंग्याची किंमत ५ लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे. या लेहंग्यावर चांदीचे रेशम आणि क्रिस्टलच्या फुलांच्या पॅटर्नची खूप हेवी रचना करण्यात आली होती. सध्या या लेहंगाचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.

ambani

याचबरोबर तिने विवाहामध्ये ३० कोटी रुपयांची रॉयल ज्वेलरी कॅरी केली होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी ज्वेलरीमध्ये हिरे आणि पन्ना जडवलेले आहेत. ज्यांची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कृशाने हातामध्ये चुडा कॅरी केला होता.

२० फेब्रुवारीला कृशा शाह अंबानी कुटुंबाची सून झाली आहे. कृशा ही एक व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. ती तिचा भाऊ मिशाल शाह सोबत DYSCO नावाची कंपनी चालवते. यासोबतच ती कंपनीची सह-संस्थापक देखील आहे. केवळ ६ महिन्यांपूर्वीच कृशाने आपले वडिल निकूंज शाह यांना गमावले आहे.

ते निकुंज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. तर कृशाची आई नीलम शाह या फॅशन डिझायनर आहेत. कृशाची मोठी बहीण नृतीने लॉस एंजेलिसमधून मीडिया-कम्युनिकेशन आणि जर्नालिझममध्ये पदवी घेतली. पण नंतर ती वडिलांसोबत व्यवसाय सांभाळू लागली. काही काळानंतर, तिला फॅशन इंडस्ट्रीत आपल्या आईसोबत काम करणे चांगले वाटले. त्यानंतर नृतीचे लग्न झाले आणि आता ती फॅशन ब्लॉगर म्हणून ओळखली जाते.

महत्त्वाच्या बातम्या
विचित्र व्यायाम! 12व्या मजल्याच्या बाल्कनीत रेलिंगला लटकून करत होता व्यायाम, व्हिडीओने उडाली खळबळ
पाणीपुरी खाल्ल्याने शरीराला होतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे, आता बिंदास खा पोटभर पाणीपुरी
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना अडकणार लग्नबंधनात? मुंबईत डेटवर जातानाचे फोटो व्हायरल
मोठी बातमी! ईडीने नवाब मालिकांना घेतलं ताब्यात, पहाटे पहाटे केली धडक कारवाई

आर्थिक इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now