इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या सीजनचे अजून फक्त दोन सामने बाकी आहेत. प्ले-ऑफमध्ये पोहोचलेल्या चार संघांपैकी गुजरातने अंतिम फेरी गाठली आहे, तर बंगळुरू आणि राजस्थानला क्वालिफायर २ मध्ये खेळणार आहे. बुधवारी, आयपीएल २०२२ च्या एलिमिनेटरमध्ये, फलंदाज रजत पाटीदारच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर बंगळुरूने लखनौविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली.(Rajat Patidar, Mega Auction, Royal Challengers Bangalore)
११२ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या या फलंदाजाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर बुधवारी आयपीएल २०२२ एलिमिनेशनमध्ये बंगळुरू संघाने लखनौविरुद्ध १४ धावांनी विजय नोंदवला. या विजयासह, त्याने क्वालिफायर २ चे तिकीट मिळवले आहे, जिथे तो क्वालिफायर १ मध्ये गुजरातकडून पराभूत झालेल्या राजस्थान संघाचा सामना करेल.
या सामन्याचा हिरो ठरलेल्या रजत पाटीदारची आश्चर्याची गोष्ट म्हणजे यंदाच्या आयपीएलच्या मेगा लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. बदली म्हणून त्याला सीजनच्या मध्यात बंगळुरू संघात स्थान देण्यात आले. सामन्यानंतर तो म्हणाला, जेव्हा मी चेंडूला चांगले टायमिंग करत होतो, तेव्हा माझे संपूर्ण लक्ष त्यावर केंद्रित होते. पॉवरप्लेचे शेवटचे ओवर क्रुणाल टाकत होता तेव्हा माझा प्लॅन योग्य ठरला आणि तेथूनच मला खूप आत्मविश्वास मिळाला.
विकेट अप्रतिम होती आणि मी काही खरोखर चांगले शॉट्स देखील मारले. मला कोणतेही दडपण जाणवले नाही, मला वाटतं की माझ्यामध्ये डॉट बॉलची भरपाई करण्याची क्षमता आहे. मी २०२१ IPL नंतर क्लब क्रिकेट खेळण्यात मी खूप व्यस्त होतो. आयपीएल २०२१ नंतर माझी निवड झाली नाही पण ते माझ्या हातात नव्हते.
रजत पाटीदार फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या IPL २०२२ मेगा लिलावात विकला गेला नाही. त्याच्या जुन्या फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने देखील त्याच्यावर बोली लावली नाही. त्याने २० लाखांच्या मूळ किमतीने लिलावात प्रवेश केला होता. तथापि, रजत पाटीदारने स्वतःचे नशीब स्वतःच लिहिले आहे, कारण त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने जवळपास अर्ध्या स्पर्धेत रिप्लेसमेंट म्हणून निवडले होते.
आरसीबीने त्यावेळी कल्पनाही केली नसेल की ते त्यांना असा सामना जिंकून देतील, ज्याची कोणाला अपेक्षाही नसेल. आयपीएल २०२२च्या एलिमिनेटर सामन्यापूर्वी, त्याला या सीजनमध्ये फक्त काही सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये तो थोडासा यशस्वी झाला, परंतु त्याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मॅचमध्ये त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळून सिद्ध केले की आरसीबीने त्याला खरेदी न करून मोठी चूक केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
आजपासून सुरू होणार महिला आयपीएलचा थरार, जाणून घ्या कुठे आणि कसे पाहायचे हे सामने
१७ कोटी दिले तरी मन भरेना, केएल राहुलने आयपीएलच्या मध्यावरच केली ही मागणी, चाहते हैराण
आयपीएलमधील चांगल्या कामगिरीचे या खेळाडूंना मिळाले फळ, टी-२० संघात मिळाली जागा
आयपीएलमध्ये फिक्सिंग? ऋषभ पंतचा तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण