देवदूत! भर युद्धात 2424 किमी बाईक चालवत पोहोचला आणि लोकांपर्यंत पोहोचवल्या आवश्यक वस्तू, औषधे

मानव धर्म हा सर्वात मोठा धर्म मानला जातो. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धातही मानवतेचा चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मग तो कोणीही असो, जेव्हा कोणी लोकांच्या मदतीसाठी पुढे येतो तेव्हा तो सर्वांसाठी हिरो बनतो. असेच काहीसे एका व्यक्तीने केले आहे ज्याने युद्ध क्षेत्राची पर्वा न करता लोकांना मदत करण्यासाठी एकट्याने 2414 किमीचा प्रवास केला.(reached-2424-km-by-bike-in-the-war-and-delivered-essential-items)

खरं तर, ब्रिटनमधील एका व्यक्तीने 48 तासांत 2414 किमीचा प्रवास जुन्या मोटरसायकलवरून केला आणि युक्रेनच्या लोकांपर्यंत औषधे आणि इतर आवश्यक गोष्टी पोहोचवल्या. लिओन क्रिब(26) असे या व्यक्तीचे नाव आहे. विशेष म्हणजे ते माजी सैनिक आहेत. खरं तर, लिओन त्याच्या जुन्या BMW R1200 RT बाईकवर लोकांच्या मदतीसाठी चेस्टर, वेस्ट ससेक्स, यूके येथून बाहेर पडला.

48 घंटे बाइक चलाता रहा डॉक्टर, 2400 किमी दूर जाकर पहुंचाई दवा! - man  Crossed 5 countries in 48 hours drove 2414 KM bike gives medicine Tsty -  AajTak

बाइकने लिओनने फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, जर्मनी आणि नंतर पोलंड(Poland) गाठले. येथून लिओनचा आणखी एक धोकादायक प्रवास सुरू झाला जो कीव येथे संपला. लिओनने कीवमधील गरजू लोकांना औषधे दिली. इतकंच नाही तर इतर काही आवश्यक गोष्टीही मदत म्हणून दिल्या. लिओन क्रिबने फ्रेंच लष्करातही काम केले आहे. आता तो यूकेमध्ये रुग्णवाहिका तंत्रज्ञ म्हणून काम करतो.

लिओनच्या म्हणण्यानुसार, त्याला पाच देशांच्या प्रवासाची अजिबात चिंता नव्हती. पण युक्रेनमध्ये प्रवेश केल्यावर त्याला भीती वाटली. त्याने मृत्यूची पर्वा न करता कीवमध्ये प्रवेश केला. तो म्हणाला, ‘ते 48 तास माझ्यासाठी खूप कठीण होते, पण मी अनेकांना मदत केली हे चांगले झाले.’

रशियन सैन्याच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील अनेक रुग्णालयांचे मोठे नुकसान झाले आहे. औषधासाठी त्रस्त झालेल्या लोकांच्या मदतीसाठी लिओन अशा हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. तो म्हणाला की, मला कोरझोवा बॉर्डरवर थांबावे लागले.

लिओनने(Leon) आपल्यासोबत बँडेज, अँटीसेप्टिक, सलाईन फ्लुइड, ट्रॉमा किट आणि इतर आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणली होती. लिओनने सांगितले की तो सध्या अविवाहित आहे, त्याची आई आणि त्याच्या कुटुंबातील इतरांनी त्याच्या जाण्याबद्दल चिंता व्यक्त केली. पण त्याने मनाशी ठरवले होते की आपण जाऊन लोकांना मदत करायची आहे.