ravish kumar resign ndtv |अदानी यांनी एनडीटीव्ही विकत घेतल्यानंतर एनडीटीव्हीतील सदस्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरुच आहे. आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड (आरआरपीआरएच) मधून प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिल्यानंतर, चॅनलचे वरिष्ठ कार्यकारी संपादक आणि प्राइम टाइम अँकर रवीश कुमार यांनीही बुधवारी संध्याकाळी राजीनामा दिला. ते २६ वर्षांपासून तिथे काम करत होते.
रवीश कुमार चॅनलचे फ्लॅगशिप शो हम लोग, रविश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राइम टाइमसह अनेक कार्यक्रमांचे अँकर होते. रवीश कुमार हे देशातील सामान्य जनतेला प्रभावित करणाऱ्या तळागाळातील समस्यांच्या कव्हरेजसाठी ओळखले जातात. रवीश कुमार यांना त्यांच्या पत्रकारितेसाठी रामनाथ गोएंका पुरस्कार आणि २०१९ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार दोन वेळा मिळाला आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, एनडीटीव्ही समूहाच्या अध्यक्षा सुपर्णा सिंह यांनी या मेलमध्ये लिहिले आहे की, रवीश यांनी एनडीटीव्हीचा राजीनामा दिला आहे आणि कंपनीने त्यांचा राजीनामा तत्काळ स्वीकारला आहे. रवीश हे लोकांवर खुप प्रभाव टाकतात त्यांचे इतका प्रभाव टाकणारे लोक फार कमी आहे.
त्यांची उंची त्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद, त्यांच्याभोवती जमलेली गर्दी, त्यांना भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणारे प्रतिष्ठित पुरस्कार आणि मान्यता यातून दिसून येते. त्याच्या दैनंदिन रिपोर्टमध्ये अशा लोकांबद्दल सांगायचे ज्यांना काम मिळत नाहीये किंवा समाजात लोकांना कशाची गरज आहे?
रवीश हे अनेक दशकांपासून NDTV चा अविभाज्य भाग होते आणि त्यांचे योगदान खूप मोठे आहे, देशात मोदी सरकारचे कट्टर टीकाकार म्हणून रवीश कुमार यांची ओळख आहे. रवीश कुमार हे त्यांच्या प्राइम शोमध्ये मोदी सरकार आणि भाजपवर सर्वाधिक टीका करताना दिसले होते.
रवीश यांच्या विरोधकांची सर्वात मोठी तक्रार ही आहे की ते भाजप आणि मोदी सरकार व्यतिरिक्त कोणत्याही राजकीय पक्ष आणि सरकारविरोधात टीकात्मक भूमिका घेत नाहीत. रवीश कुमार मोदी सरकारचे गुणगान करणाऱ्या मीडिया संस्थांना गोदी मीडिया म्हणतात. त्यामुळे ते सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलही होतात.
महत्वाच्या बातम्या-
School : ८-९ वीत शिकणाऱ्या मुलांच्या बॅगेत सापडले कंडोम, सिगारेट आणि दारु; देशभरात उडाली खळबळ
rambhau khandare : मुलासाठी दिवसरात्र केलेल्या कष्टाचं झालं चीज, ५० वर्षे बुट पॉलिश करणाऱ्याचा मुलगा बनला अधिकारी
BJP : भाजप मंत्र्याने शिंदेंसोबत केली शिवरायांची तुलना; म्हणाला शिंदेसुद्धा शिवरायांप्रमाणेच पळाले…






