Share

टुर्नामेंटमधून चेन्नई बाहेर झाल्यानंतर रविंद्र जडेजा भडकला, सगळ्यांसमोर ‘या’ गोष्टींना धरले जबाबदार

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या 38 व्या सामन्यात पंजाब किंग्जने (Punjab Kings) 4 वेळा जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा ( Chennai Super Kings) 11 धावांनी पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकूनही चेन्नई सुपर किंग्ज सामना जिंकण्यात अयशस्वी ठरला.(Ravindra Jadeja erupts after Chennai’s exit from the tournament)

प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 20 ओवरमध्ये 4 बाद 187 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला 6 विकेट्सवर 176 धावाच करता आल्या. चेन्नईसाठी अंबाती रायुडूने 39 चेंडूत 78 धावा केल्या, मात्र रबाडाने त्याची विकेट घेत चेन्नईच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या. एकवेळ हा सामना चेन्नई जिंकेल असे वाटत होते पण अंबाती रायडू आणि धोनीच्या विकेट्सनंतर ही आशा मावळली.

पंजाब किंग्स

सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजा म्हणाला, “आम्ही चांगली सुरुवात केली, शेवटी आम्ही 10-15 धावा दिल्या. आम्ही आमच्या योजना चांगल्या प्रकारे कृतीत आणल्या नाहीत. रायडू शानदार फलंदाजी करत होता, पण मी आधी म्हटल्याप्रमाणे आम्ही त्यांना 175 पेक्षा कमी रन मिळू दिल्या असत्या तर बरे झाले असते. पहिल्या 6 ओवरमध्ये आम्हाला चांगली सुरुवात करता आली नाही, जिथे आमच्यात कमतरता आहे आणि आशा आहे की आम्ही जोरदार पुनरागमन करू.”

चेन्नईकडून अंबाती रायडूशिवाय ऋतुराज गायकवाडने 30, महेंद्रसिंग धोनीने 8 चेंडूत 12 धावा केल्या. रवींद्र जडेजा 16 चेंडूत 21 धावा करून नाबाद राहिला. पंजाब किंग्जकडून कागिसो रबाडा आणि ऋषी धवन यांनी 2-2 विकेट घेतल्या, तर संदीप शर्मा आणि अर्शदीप सिंग यांनीही 1-1 विकेट घेण्यात यश मिळवले. अर्शदीप सर्वात किफायतशीर होता. त्याने 4 ओवरमध्ये फक्त 23 धावा दिल्या.

पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या पराभवानंतर कर्णधार रवींद्र जडेजाच्या संथ फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जडेजाने अधिक चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली असती, तर चेन्नईचा संघ विजयाच्या जवळ पोहोचू शकला असता, असे मत माजी वेगवान गोलंदाज आर.पी. सिंग यांनी व्यक्त केलं.

पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजाने 16 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या. यादरम्यान त्याने केवळ एक चौकार आणि एक षटकार मारला पण आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्यामुळेच त्याच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच चेन्नई सुपर किंग्जचे चाहते प्रचंड नाराज झालेले पाहायला मिळाले.

महत्वाच्या बातम्या-
कर्णधारपद सोडल्यानंतर धोनीला संघात जागा मिळणं कठीण? रवींद्र जडेजाने निवडले प्लेइंग ११
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर रवींद्र जडेजा आणि श्रेयस अय्यरवर झाला अन्याय; पहा नक्की काय घडलं
धोनी मैदानात होता, त्यामुळे आम्ही जिंकणार हे ठरलेलं होतं; सामना जिंकल्यानंतर जडेजाने केले धोनीचे कौतूक
जडेजाने धोनीबद्दल घेतलेला ‘तो’ निर्णय पडला महागात; गमवावा लागला पहिलाच सामना

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now