Share

वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेआधीच टिम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू झाला बाहेर

team india

दक्षिण आफ्रिकेनंतर(South Africa) भारतीय संघ(Indian Team)वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ६ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पण ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील एक महत्वाचा खेळाडू दुखापतीमुळे या मालिकेला मुकणार आहे.(ravichndran ashwin out from indin team because of injury of)

भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन(Ravichandran Ashwin) दुखापतीमुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. भारतीय गोलंदाज रविचंद्रन अश्विन दीर्घकाळानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या क्रिकेट सामन्यात भारतीय प्रेक्षकांना पहायला मिळाला. रविचंद्रन अश्विन भारतीय संघातील महत्वाचा गोलंदाज आहे.

मोठमोठे फलंदाज रविचंद्रन अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकतात. रविचंद्रन अश्विनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्याची संधी मिळाली होती. पण त्या सामन्यांमध्ये तो फारसा प्रभाव पडू शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय गोलंदाज रविचंद्रन अश्विन खांद्याच्या दुखापतीमुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडणार आहे.

या मालिकेसाठी रविचंद्रन अश्विनच्या जागी गोलंदाज कुलदीप यादवला संधी मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाला वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका जिंकणे महत्वाचे आहे. या मालिकेत भारतीय फलंदाज रोहित शर्मा पहिल्यांदाच कर्णधार पदाची भूमिका बजावणार आहे. फीटनेसच्या कारणामुळे रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौरा खेळू शकला नव्हता.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित फीट असून तो वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका खेळणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा बुधवारी सकाळी ११.३० वाजता फिटनेस चाचणी देणार आहे. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा भारतीय संघाची घोषणा करणार आहे. १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान कोलकातामध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध तीन टी- 20 सामने खेळवले जाणार आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात शिखर धवन, के एल राहुल, रिषभ पंत, शार्दूल ठाकूर, सूर्यकुमार यादव, इशांत किशन, रवींद्र जडेजा, दीपक चहर, मोहम्मद सिराज, यजुर्वेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :-
सासूचा कायमचाच काटा काढण्यासाठी सुनेने 3 वर्ष रचला कट; आणि…, वाचा पुढचा थरकाप उडवणारा प्लान
एका फोन कॉलने अक्षय कुमारच्या स्वप्नांवर पाणी फेरले; एका झटक्यात सगळी स्वप्न धुळीला मिळाली..
दक्षिण आफ्रिकेत ‘या’ खेळाडूंमुळे झाला पराभव, मोहम्मद शमीने स्पष्टच सांगीतलं

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now