एमएस धोनी (MS Dhoni) हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने तीन आयसीसी (ICC) विजेतेपदे जिंकली. 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वप्रथम टी-20 विश्वचषक जिंकला होता. यानंतर धोनी ब्रिगेड 2011 विश्वचषक तसेच 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरला.(Ravi Shastri was angry with Dhoni on the field)
एवढं सगळं करूनही धोनीला एके काळी प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या (Ravi Shastri) ओरडण्याला सामोरे जावे लागले होते. एका वृत्तसंस्थेशी झालेल्या संवादात टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी याचा उल्लेख केला आहे. शास्त्री यांनी माजी कर्णधार धोनीला सुनावले होते, कारण तो पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्याच्या काही मिनिटे आधीपर्यंत फुटबॉल खेळत होता.
आयपीएल 2022 मध्ये सीएसके आणि सनरायझर्स यांच्यातील सामन्यापूर्वी शास्त्री म्हणाले, ‘त्याला (धोनी) फुटबॉल आवडतो. त्याच फुटबॉल खेळण खूप भयावह आहे कारण तो ज्या तीव्रतेने खेळतो ते पाहून तुम्हाला नक्कीच वाटेल की हा काहीतरी दुखापत करून घेईल. शास्त्री म्हणाले की, मला आठवते की आशिया कप फायनलच्या आधी दव पडले होते, तो टॉसच्या पाच मिनिटे आधी घसरला होता.
भारताच्या माजी मुख्य प्रशिक्षकाने असा खुलासाही केला की, त्याने आयुष्यात कधीही असे ओरडले नव्हते. शास्त्री म्हणाले, आयुष्यात मी असं कधीच कोणावर ओरडलो नव्हतो, म्हटलं खेळणं बंद कर. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मला आमचा मुख्य खेळाडू गमावायचा नव्हता कारण पाच मिनिटांनंतर नाणेफेक होती.
एमएस धोनीचे फुटबॉलवरील प्रेम कोणापासून लपलेले नाही. क्रिकेटकडे वळण्यापूर्वी धोनी फुटबॉल खेळायचा. त्याचे फुटबॉलवरील प्रेम अजूनही कायम आहे. सामना सुरू होण्यापूर्वी वॉर्म अप दरम्यान 40 वर्षीय खेळाडू अनेकदा चेंडूला किक मारताना दिसतो. तो अधूनमधून चॅरिटी सामन्यांमध्ये फुटबॉल खेळतानाही दिसतो.
9 एप्रिल (शनिवार) रोजी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात धोनी फक्त 3 धावा करू शकला. उमरान मलिकच्या हातून धोनीला मार्को जॅन्सेनने झेलबाद केले. चेन्नई सुपर किंग्जसाठी पहिल्या दोन सामन्यांमध्ये धोनी उत्कृष्ट खेळताना दिसला होता, जिथे त्याच्या बॅटने काही खास शॉट्स दिलेले पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या-
रोहितने IPL मध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकूनही धोनीच आहे ग्रेट कॅप्टन ; माजी क्रिकेटपटूने दिला पुरावा
कर्णधारपद सोडल्यानंतर धोनीला संघात जागा मिळणं कठीण? रवींद्र जडेजाने निवडले प्लेइंग ११
चेन्नई सुपर किंग्सचे १४ कोटी गेले पाण्यात, हा स्टार खेळाडू नाही खेळू शकणार आयपीएल? धोनीला झटका
कर्णधारपद सोडल्यानंतर धोनीला संघात जागा मिळणं कठीण? रवींद्र जडेजाने निवडले प्लेइंग ११