दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर 24 तासांत विराट कोहलीनं कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. 33 वर्षीय विराटच्या या निर्णयानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यात भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचाही समावेश आहे. (Ravi Shastri claims about Virat Kohli )
विराट कोहली आणखी दोन वर्ष तरी कसोटी संघाच्या कर्णधारपदावर कायम राहिला असता,परंतु त्याचे यश अऩेकांच्या पचनी पडले नसते, असा खळबळजनक दावा शास्त्री यांनी केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले,”विराट कोहलीनं कसोटी संघाच्या कर्णधारपदावर कायम राहायला हवे होते की नाही, तर हो. त्यानं आणखी दोन वर्ष तरी कसोटी संघाचे नेतृत्व संभाळले असते.’
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘पुढील दोन वर्षांत भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे आणि त्यांचा मुकाबला कसोटी क्रमवारीत 9-10 क्रमांकावर असलेल्या संघांसोबत आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून त्याच्या नावावर 50-60 विजय नक्की नोंदवले गेले असते, परंतु हे अनेक लोकांना पचनी पडले नसते. त्यांची पोट दुखी सुरू झाली असती.
दरम्यान, कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. त्यातच आता पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू रशीद लतिफ याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
एका मुलाखतीत पाकिस्तानचे क्रिकेटपटू रशीद लतिफ यांना सध्या भारतीय क्रिकेट संघात घडणाऱ्या घटनांवर काही प्रश्न विचारण्यात आले. यावर व्यक्त होताना क्रिकेटपटू रशीद लतिफ म्हणाले की, “विराटच्या आयुष्यात असा टप्पा येण्याचं कारण म्हणजे त्याचे भारतीय क्रिकेट बॉर्डशी असलेले मतभेद. विराटने जरी कर्णधारपद सोडण्याचं निर्णय वैयक्तिक असल्याचं सांगितलं असलं किंवा सौरव गांगुली ट्विट करून विराटच्या वैयक्तिक निर्णयाचं स्वागत जरी करत असला तरीही या दोघांमध्ये भांडणचं आहे, असे माझे स्पष्ट आहे.
“काही खेळाडू भावनाप्रधान असतात. त्यांना माहिती आहे की, विराट कोहलीसारख्या आक्रमक व्यक्तिला कसं आणि कधी भडकवायचं. जेव्हा त्याने टी२० कर्णधारपद सोडलं, तेव्हा थोड्या दिवसातच त्याला वन डे कर्णधारपदावरूनही दूर करण्यात आले. पण त्यांना हे समजत नाहीये की अशी खेळी करून तुम्ही विराट कोहलीच नव्हे तर संपूर्ण भारतीय क्रिकेटलाच धक्का पोहचवला आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी त्या मुलाखतीत दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
सलमानचा फार्म हाऊस गुन्हेगारीचा अड्डा? लहान मुलांची तस्करी, कलाकारांचे मृतदेह; सलमानवर गंभीर आरोप
बर्थडे सेलिब्रेट करायला गेले, पण वाटेतच होत्याचं नव्हतं झालं! वाचा वर्ध्यातील अपघाताचा थरारक घटनाक्रम
२०२४ मध्ये भाजपचा पराभव करणं सहज शक्य, पण त्यासाठी… ; प्रशांत किशोर यांचे मोठे वक्तव्य
वामिकाचे फोटो व्हायरल झाल्याने विराट-अनुष्का त्रस्त; पोस्ट शेअर करत म्हणाले, आम्ही विनंती…