Share

भाजपने शिवरायांचा पुतळा हटवल्याने मित्रपक्ष नाराज; पाठींबा काढत थेट राजीनामे दिले

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी आमदार रवी राणा यांनी कोणतीही परवानगी न घेता राजापेठ येथील उड्डाण पुलावर शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. पण प्रशासनाने कोणतीही परवानगी न घेता बसवलेला पुतळा  प्रचंड पोलिस बंदोबस्तात हटवण्यात आला होता. रात्री राजापेठ उड्डाण पुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते, नंतर हा पुतळा काढण्यात आला.

या पुतळ्यावरून आता राजकारण चांगलेच तापले असून आज अमरावती महापालिकेवर रवी राणा यांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या तिन्ही नगरसेवकांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. भाजपने या प्रकरणात पाठिंबा न दिल्यामुळे नगरसेवकांनी हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले आहे.

यामध्ये सुमती ढोके,आशिष गावंडे व सपना ठाकूर यांनी नगरसेवकपदाचे राजीनामे दिले आहे. दरम्यान, यावेळी बोलताना युवा स्वाभिमानच्या नगरसेविका सुमती ढोके यांनी सांगितले की, ‘भारतीय जनता पक्षाने सुद्धा शिवाजी महाराजांचा पुतळा वाचवण्यासाठी कुठलीही भूमिका न घेतल्याने आम्ही राजीनामे देत आहोत.’

दरम्यान, महानगरपालिकेने शिवाजी महाराजांचा पुतळा उचलून तो अक्षरश: या महानगरपालिकेच्या भंगारामध्ये टाकल्याचा गंभीर आरोप सुद्धा सुमती ढोके यांनी केला. आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा वाचू शकत नसेल तर आमची महानगरपालिकेत राहण्याचे लायकी नसलेले ते सांगत या नगरसेवकांनी राजीनामे महानगर पालिका आयुक्तांकडे सुपूर्द केले आहे.

दरम्यान, या पुतळ्यावरून आता राजकारण चांगलेच तापले असून आ रवी राणा व खा नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस व SRPf चा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी अशी मागणी रवी राणा यांनी ३ दिवसांपूर्वी महापालिकेत केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणावरून राजकारण करत असल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर करण्यात येत होता. हे सर्व आरोप राणा यांनी फेटाळून लावले. पुतळा हटवण्याच्या घटनेचा निषेध करताना नवनीत राणा म्हणाल्या, “सदर ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा, म्हणून तीन वर्षांपासून परवानगी मागण्यात येत होती. पण वेळोवेळी प्रशासनाने ती परवानगी नाकारली.”

“बाळासाहेब ठाकरे यांना शिवाजी महाराजांबद्दल कुणी काही बोललं तरी सहन होत नव्हतं. पण त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास परवानगी मिळत नाही. महाराजांचा पुतळा रात्रीतून अचानक हटवण्याचं काम प्रशासन करत आहे,” असं नवनीत राणा म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या
किरण मानेंच्या पत्नीने घेतली राज्य महिला आयोगाकडे धाव, तक्रार दाखल करत केले गंभीर आरोप
ज्या खासदाराला मोदी सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला तो निघाला चीनचा गुप्तहेर; जगभरात खळबळ
भयानक प्रथा! नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारानंतर मृतदेहाचे मांस खातात अन् राखेचे सूप बनवून पितात ‘हे’ लोक
भयानक प्रथा! नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारानंतर मृतदेहाचे मांस खातात अन् राखेचे सूप बनवून पितात ‘हे’ लोक

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now