Share

Eknath Shinde : ‘या’ बड्या नेत्याची एकनाथ शिंदेंना थेट ऑफर; म्हणाले, आमचं चिन्ह आणि नाव दोन्ही वापरा

eknath shinde

ravi rana offer eknath shinde  | निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या चिन्हाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी अंधेरी पोटनिवडणूकीपर्यंत शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर बंदी घातली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांसाठी हा मोठा धक्का आहे. त्यामुळे निवडूकीला दोन्ही गटांना वेगळे नाव आणि चिन्ह वापरावे लागणार आहे.

आता उद्धव ठाकरे यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही नवे चिन्ह शोधावे लागणार आहे. आता एकनाथ शिंदेंच्या या कठीण प्रसंगात आमदार रवी राणा धावून आले आहे. एकनाथ शिंदेंच्या मदतीसाठी त्यांनी पुढाकार घेतला असून एक खास ऑफर त्यांना दिली आहे.

रवी राणा यांनी निवडणूक आयोगाच्या निकालानंतर एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आदरणीय शिंदेसाहेब आपणास गरज पडल्यास आपण माझ्या पक्षाचे असलेले पाना चिन्ह घेऊन उभे राहू शकतात. आपण युवा स्वाभिमान पार्टी आणि पाना चिन्ह घ्यावे.

रवी राणा यांची ही ऑफर सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. तसेच आता एकनाथ शिंदे ही ऑफऱ स्वीकारणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण सध्या रवी राणा यांचे हे ट्विट खुप व्हायरल होत आहे. तसेच अनेक कार्यकर्ते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहे.

दरम्यान, आपण खरी शिवसेना म्हणत एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावर दावा ठोकला होता. हा वाद आधी सर्वोच्च न्यायालयात गेला होता. पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल असे म्हटले होते. त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे पोहचला.

निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना या संदर्भात पुरावे आणायला लावले होते. पण पुरावे देऊन सुद्धा निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी रात्री निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता निवडणूक कोण कोणतं चिन्ह घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Uddhav Thackeray : आयोगाने चिन्ह गोठवताच उद्धव ठाकरे झाले आक्रमक, शिवसैनिकांना दिला खास संदेश; म्हणाले…
Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठाकरेंची फक्त दोनच शब्दात तिखट प्रतिक्रिया, म्हणाले…
Uddhav Thackeray : नाव, चिन्ह जाऊन सुद्धा ‘हा’ हुकूमी एक्का आहे उद्धव ठाकरेंकडं; निवडणूकीतही गाजवणार मैदान

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now