काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हटल्याप्रकरणी नवनीत राणा यांना तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. राणा दाम्पत्याची तब्बल 12 दिवसांनी तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे. तर दुसरीकडे नवनीत राणा यांना स्पॉडेलायटिसचा त्रास होऊ लागला.
त्रास होऊ लागल्याने नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आलं होतं. त्यांचा एमआरआय स्कॅन करण्यात आला आहे. याचबरोबर नवनीत राणा सध्या स्पॉन्डिलायसिस या आजाराने त्रस्त आहेत. तसेच डॉक्टरांनी फुल बॉडी चेकअपही केलं आहे.
अखेर नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना रवी राणा यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जहरी शब्दात टीका केली. ‘संजय राऊत चवन्नीछाप आहेत. संजय राऊत कोर्टाच्या निर्णयावरही टीका करतात,’ असं रवी राणा यांनी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना रवी राणा म्हणाले, ‘कोर्टाने जो निर्णय दिला त्याचे आम्ही पालन करणार आहोत. राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असल्याचे कोर्टाने सांगितल्यानंतरही त्यावर आक्षेप घेण्याचे काम राऊत यांनी केले. ते ’20 फूट खोल गाडण्याची धमकी आम्हाला देतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. मात्र हनुमानाचे नाव घेतल्यावर आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो हे दुर्दैव आहे,”
दरम्यान, पुढे बोलताना रवी राणा यांनी थेट ठाकरे सरकवरवर ताशेरे ओढले आहे. ‘आम्हाला पोलीस ठाण्यात नेऊन चहा पाजला. त्यानंतर रात्री सांताक्रूझला लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर आम्हाला पाणीसुद्धा दिले नाही. उद्धव ठाकरे सरकार एका महिलेला घाबरल्याने त्यांनी एवढी सक्तीची कारवाई असल्याची घणाघाती टीकाही रवी राणांनी केली.
याचबरोबर ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये अहंकार असेल, तर एक लक्षात ठेवा रावणाचा सुद्धा अहंकार टिकला नाही. रामाने त्याचा सर्वनाश केला. अहंकारने मुख्यमंत्री सत्तेचा गैरवापर करत आहेत, त्यामुळे रावणाचे जे झाले तेच यांचेही होईल, असं म्हणत राणा यांनी ठाकरे सरकारला लक्ष केले.
महत्त्वाच्या बातम्या
सरकार नालायक असेल, तर…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांवर संतापले
वसंत मोरेंच्या महाआरतीला पदाधिकाऱ्यांची दांडी; मोरे म्हणाले, तात्या जी भूमिका मांडतो, ती योग्यच असते
युवराज सिंगची गर्लफ्रेंड करतेय ‘या’ खेळाडूशी दुसरं लग्न, नावं ऐकून हैराण व्हाल
‘…यामुळे बाळासाहेब ठाकरे नेहमी आनंद दिघेंवर रागवायचे’; उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा