Share

ravi rana : रवी राणांची सपशेल माघार! बच्चू कडूंसोबतच्या बादाबाबत म्हणाले, महाराष्ट्राच्या सेवेसाठी हा विषय..

bachchu kadu ravi rana

ravi rana : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिंदे गटात सामील झालेले अपक्ष आमदार बच्चू कडू आणि भाजप आमदार रवी राणा यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमधील वाद अगदी विकोपाला केला होता. अखेर हा वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला.

अखेर दोघांमधील वाद मिटला असल्याची माहिती समोर आली आहे. बच्चू कडूंबाबत वापरलेले शब्द रवी राणांकडून मागे घेण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या सेवेसाठी वाद – विवाद नको, म्हणून हा विषय संपवतोय, असं रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा यांना रविवारी मुंबईत आपल्या ‘वर्षा’ निवासस्थानी बोलावले होते. त्यानुसार, रात्री 10 वाजताच्या सुमारास बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले. रविवारी रात्री तब्बल अडीच तास ही बैठक चालली.

‘हम साथ साथ हे’अशा एका वाक्यात राणा यांनी सांगितले आहे. माध्यमांशी बोलताना आमदार रवी राणा यांनी म्हटले की,  शिंदे-फडणवीस हे माझे मार्गदर्शक नेते आहे. वर्षा बंगल्यावर अडीच तास मिटिंग झाली. आमदार बच्चू कडू यांच्या बरोबर वाद होते, काही मतभेद होते ते मिटले.

पुढे रवी राणा म्हणाले की, बच्चू कडू यांनी देखील काही अपशब्द वापरले  आहेत. हे शब्द ते देखील मागे घेतील. आम्ही दोघेही सरकार सोबत आहोत. सरकारबरोबर आम्ही काम करू. माझ्याकडून वादावर पडदा पडला असल्याचेही राणा यांनी सांगितले. अखेर दोघांमधील वाद मिटला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचा विकास, उन्नती आणि जनतेला न्याय देण्यासाठी राज्यात शिंदे, फडणवीस सरकार आहे. अडीच वर्षात उद्धव ठाकरे जे करू शकले नाहीत, ते तीन महिन्यांत या सरकारने केलं. त्यामुळे हा विषय मी संपवत असल्याच सांगत राणा यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या  
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी… 
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई 
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर 
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर
ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now