गेल्या काही दिवसांपूर्वीच ईडीने शिवसेना खासदार संजय राऊतांवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे संजय राऊतांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. अशातच त्यांच्यावर आणखीन एक संकट येऊन कोसळले आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी राऊतांवर गंभीर आरोप लावले आहेत.
मोहित कंबोज यांनी म्हटले आहे की, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माझ्याकडून २५ लाख रुपये उकळले होते, मला हे पैसे ते व्याजासकट परत देणार होते. मी राऊतांना धनादेशाद्वारे २५ लाख दिले होते. या धनादेशाचे तपशील आणि इतर पुरावे द्यायला मी तयार आहे.
तसेच, मी पुरावे सादर केले तरी मुंबई पोलीस संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करायला तयार आहेत का असा सवाल त्यांनी विचारला आहे. गुरुवारी कंबोज यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी “२०१४ साली संजय राऊत यांनी मला थेट ‘सामना’च्या कार्यालयात बोलावून धमकावले.
त्यावेळी संजय राऊत यांनी माझ्याकडून २५ लाख रुपये घेतले. हे पैसे संजय राऊत मला व्याजासकट परत करणार होते. पण आजपर्यंत त्यांनी हे पैसे परत केलेले नाहीत” असा आरोप राऊतांवर लावला आहे.
पुढे बोलताना, याकारणाने संजय राऊतांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. आयएनएस विक्रांत प्रकरणात पोलिसांनी किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल केला. मग आता माझीही तक्रार पोलीस दाखल करुन घेणार का नाही? याचे उत्तर आयुक्त संजय पांडे यांनी द्यावे, असे कंबोज यांनी म्हटले आहे.
दरम्यान बुधवारी संजय राऊतांनी थेट भाजप नेते किरीट्ट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतसंदर्भात गंभीर आरोप लावले होते. त्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी कोट्यवधी जमा करत ते पैसे निवडणुकीसाठी तसंच मुलाच्या कंन्स्ट्रक्शन कंपनीत वापरले असल्याचे म्हटले होते. त्यांनी केलेल्या या आरोपानंतर त्वरित किरीट्ट सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरीट्ट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात माजी सैनिक बबन भोसले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या सर्व प्रकरणानंतर भाजप नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
Virajas Kulkarni : विराजस कुलकर्णीला पुण्यातील रस्त्यावर दिसलं होतं भूत; स्वतःच खुलासा करत म्हणाला,…
शॉर्टकट घेणे पडले महागात, शाळेत रिजल्ट घ्यायला जाणाऱ्या आजीचा आणि नातीचा रेल्वेच्या धडकेने मृत्यु
सदावर्तेंनी केलं फडणवीस, चंद्रकांत पाटलांचं तोंडभरून कौतूक; म्हणाले, त्यांनी ५ महिने कष्टकऱ्यांना अन्न दिलं
सुप्रिया सुळेंसोबतच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर शशी थरुर यांनी दिली रोमॅंटीक प्रतिक्रिया; म्हणाले..