झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत ‘शेवंता’ या भूमिकेद्वारे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva nemlekar) खूपच लोकप्रिय झाली होती. पहिल्या सीझनला मिळालेल्या यशानंतर मालिकेचा दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सीझनमध्येही अपूर्वाने आपल्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. मात्र, त्यानंतर आलेल्या तिसऱ्या सीझनमधून अपूर्वा काही कारणाने बाहेर पडली.
शेवंता ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत पुन्हा दिसली नसली तरी शेवंता या पात्राद्वारे तिने तिचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण केला. सोशल मीडियावरही तिला अनेकजण फॉलो करतात. अपूर्वासुद्धा सोशल मीडियावर सक्रिय राहत तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. याद्वारे ती तिच्या संबंधित प्रत्येक अपडेट्स चाहत्यांना देत असते.
नुकतीच अपूर्वाने तिच्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला. हा फोटो त्यांच्या गोवा ट्रीपदरम्यानचा आहे. अपूर्वा आईसोबत गोव्यात सुट्ट्यांचा आनंद लुटायला गेली होती. हा फोटो शेअर करत अपूर्वाने आईसाठी एक खास पोस्टसुद्धा लिहिली. यामध्ये तिने म्हटले की, ‘जगातील सर्व अंधार एका मेणबत्तीचा प्रकाश विझवू शकत नाही. आय लव्ह यू मम्मी’
यानंतरही अपूर्वाने आईचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये एका फोटोत अपूर्वाची आई घराच्या दरवाजातून बाहेर बघताना दिसत आहेत. तर दुसऱ्या एका फोटोत त्या विमानाच्या खिडकीतून बाहेर बघताना दिसत आहेत. अपूर्वाने शेअर केलेल्या या फोटोतील आईचा साधेपणा पाहून अनेकजण भारावून जात आहेत.
अपूर्वा एक प्रसिद्ध अभिनेत्री असूनही तिची आई अत्यंत साध्या असल्याचे या फोटोत पाहायला मिळत आहे. अपूर्वाच्या आईचे हे फोटो चाहत्यांचे मन जिंकून घेत आहेत. त्यामुळे चाहते या फोटोंना अनेक लाईक्स देत आपली पसंती दर्शवत आहेत.
दरम्यान, अपूर्वाने झी मराठीवरील ‘आभास हा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘तू माझा सांगाती’, ‘आराधना’, ‘तू जीवाला गुंतवावे’, ‘प्रेम’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे तिला फार लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेतील शेवंता या भूमिकेने तिने प्रेक्षकांचा मने जिंकून घेतली होती. तर लवकरच आता नव्या भूमिकेद्वारे अपूर्वा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
एक उत्तम उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच अपूर्वा एक उद्योजिका देखील आहे. २०१५ साली अपूर्वाने तिच्या हँडमेड दागिन्यांचा ब्रँड बाजारात उतरवला होता. ‘अपूर्वा कलेक्शन’ असं तिच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव आहे. अभिनयातून वेळ काढून अपूर्वाने उद्योग क्षेत्रात उतरणं हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘मॅडम ब्लाऊज घालायच्या विसरल्या वाटतं…’; ‘त्या’ बोल्ड फोटोवरून प्राजक्ता माळी तुफान ट्रोल
कंगनाने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा; पहा व्हायरल व्हिडिओ
लहानपणी क्रिकेट खेळण्यावरून मारायचे वडील, आता IPL मधून कमावले करोडो रुपये, वाचा यशोगाथा