ratnagiri grampanchayat election result | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडून शिंदे-भाजपचे सरकार आले आहे. या सरकारला सुद्धा जवळपास तीन महिने उलटून गेले आहे. त्यानंतर राज्यातील ग्रामपंचायती निवडणूका होताना दिसत आहे. राज्यातील १८ जिल्ह्यातील ८२ तालुकांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी मतदार पार पडले आहे.
या निवडणूका झाल्यानंतर आता याची मतमोजणी सुरु झाली आहे. आता रत्नागिरी जिल्ह्यातील निकाल समोर आले आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच वर्चस्व कायम असल्याचे दिसून येत आहे. गुहागर या ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांचा सुपडा साफ झाला आहे.
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या मतदार संघात अजूनही त्यांचाच प्रभाव असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. निवडणूका झालेल्या ग्रामपंतायतींची निकाल हाती लागत आहे. गुहागरमध्ये भाजपकडे दोन ग्रामपंचायती होत्या. तिथे आता शिवसेनेने भगवा फडकवला आहे.
अंजनवेल आणि वेलदूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व दिसून येत आहे. दिव्या वनकार या वेलदूरच्या सरपंच झाल्या आहे. तर सोनल रामनाथ मोरे या अंजनवेलच्या सरपंच झाल्या आहे. अशा प्रकारे भास्कर जाधवांनी भाजप आणि शिंदे गटाचा आपल्या मतदार संघातून सुपडा साफ केला आहे.
रत्नागिरीमध्ये एकूण ५१ ग्रामपंचाती आहे. त्यामध्ये ३६ ग्रामपंचायतीमध्ये मतदान झाले आहे. १५ बिनविरोध ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडणूका झाल्या आहे. तर शिवसेना (ठाकरे गट) ११ ठिकाणी, शिंदे गट ४ मतदार संघ, राष्ट्रवादी १ तर इतरांना ६ अशा पंतायती मिळाल्या आहे.
दरम्यान, शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठे बंड केले आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदारही गेले आहे. तसेच १२ खासदारही गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे म्हटले जात आहे. पण स्थानिक निवडणूकांमध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. स्थानिक पातळीवर बंडाचा फारसा परिणाम पाहायला मिळाला नाही.
महत्वाच्या बातम्या-
Business: सफाई कामगाराची मुलगी झाली करोडपती, नोकरी सोडून केला ‘हा’ व्यवसाय, उभे केले भलेमोठे साम्राज्य
Sanjay Raut : “राज ठाकरे यांचे पत्र म्हणजे ठरवून लिहिलेली स्क्रिप्ट”; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर घणाघात
politics : शिंदेगटाच्या गोगावलेंना मोठा धक्का; स्वतःच्या गावची ग्रामपंचायत गमावण्याची नामुश्की, मविआने मारली बाजी