ratlam mahalaxmi temple | मध्य प्रदेशातील रतलामचे महालक्ष्मी मंदिर त्याच्या सजावटीमुळे देशभर प्रसिद्ध आहे. राज्यासह परराज्यातून लोक येथे दर्शनासाठी येतात. आतापर्यंत मंदिरासाठी अनेक भाविकांनी सजावटीसाठी पैसे आणि दागिने जमा केले आहेत. अनेक भाविकांनी येथे सोन्याच्या नोटा, चांदीच्या विटा आणि तिजोरी ठेवल्या आहेत.
दागिने आणि पैशांनी सजलेले महालक्ष्मी मंदिर दिवाळीच्या रात्री ८ वाजल्यापासून बंद होते. जे दिवाळीनंतर उघडते. त्यानंतर मंदिराची स्वच्छता केली जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून इथे एक वेगळी परंपरा पाळली जाते. दिवाळीत या ठिकाणी फुलांचे नाही, तर नोटांचे तोरण बांधले जाते.
दरवर्षी या मंदिरात लोक आपली संपत्ती ठेवतात. तसेच भाविकांनी ठेवलेल्या पैशांचा नीट हिशोब ठेवला जातो. त्यानंतर दिवाळी जेव्हा होऊन जाते, त्यानंतर त्या लोकांना त्यांची त्यांची संपत्ती परत केली जाते. यंदा सुमारे ५०० लोकांनी देवीच्या चरणी कोट्यवधी रुपयांची संपत्ती ठेवली आहे.
देवीचे मंदिर पुर्णपणे नोटांनी सजवले जाते. तर सोने-चांदीच्या दागिन्यांनी देवीचा श्रृंगार केला जातो. पण यंदा भाविकांकडून फक्त नोटा घेण्यात आल्या आहे. कारण दिवाळीच्या दुसऱ्याची दिवशी सूर्यग्रहण आहे. त्यामुळे दागिन्यांचा हिशोब ठेवणे कठीण जाऊ शकतो. त्यामुळे मंदिराच्या ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे.
महालक्ष्मी मंदिर सजावटीनंतर बंद करण्यात आले आहे. मंदिराबाहेरूनच दर्शनाची व्यवस्था करावी लागणार आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर नो व्हेइकल झोन करण्यात आला आहे. पंडित संजय पुजारी यांच्या मते मंदिराच्या स्थापनेचा कोणताही ठोस पुरावा नाही. परंतु मंदिराची स्थापना ४०० वर्षांपूर्वी तत्कालीन संस्थानातील राजा रतन सिंह यांनी केल्याचे सांगितले जाते.
धनत्रयोदशीच्या दिवशी संस्थानच्या तिजोरीतील दागदागिने, रोख रक्कम या सगळ्या गोष्टी महालक्ष्मीच्या चरणी ठेवल्या जातात. याठिकाणी ठेवण्यात आलेल्या दागिने, पैशांची नोंदणी केली जाते. तसेच दिवाळीनंतर ते पैसे आणि दागिने भाविकांना परत केले जातात.
महत्वाच्या बातम्या-
Shivsena : “फडणवीसांच्या ‘त्या’ निर्णयामुळे मुख्यमंत्री नाराज, शिंदे गटातील २२ आमदारही भाजपात विलीन होणार”
Shivsena : मुख्यमंत्र्यांनी फक्त ‘हे’ काम करावे, उद्धव ठाकरे दौरा रद्द करतील; शिवसेनेचे ओपन चॅलेंज
IND vs PAK : विराटच्या वादळात पाकीस्तान उद्धवस्त; ३६४ दिवसांनी भारताने घेतला पराभवाचा बदला