देशभरातील विविध विमानतळांचं खाजगीकरण करण्यात येत असताना आता सरकानं नोएडा विमानतळाचंही खाजगीकरण केलं असून त्यासाठी करण्यात आलेल्या लिलावामध्ये टाटा ग्रुपनं बाजी मारली आहे. त्यामुळं आता एअर इंडिया ही विमान कंपनी खरेदी केल्यानंतर टाटा ग्रुपनं नोएडा विमानतळाच्या प्रशासनावरही ताबा मिळवल्यानं प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं कौतुक आणि तितकीच प्रशंसादेखील होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नोएडा विमानतळाचं खाजगीकरण होण्याची माहिती मिळताच त्याच्या प्रशासनावर ताबा मिळवण्यासाठी म्हणजेच त्याला खरेदी करण्यासाठी टाटा ग्रुप, लार्सन अँड टुब्रो आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या शापूरजी पलॉंजी ग्रुप रेसमध्ये होते. परंतु टाटा ग्रुपनं वरील दोन्ही कंपन्यांना धोबीपछाड देत या विमानतळावर कब्जा केला आहे.
गेल्या वर्षी २५ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोएडा विमानतळाची पायाभरणी केली होती. या विमानतळाला सरकारी आणि खाजगी लोकांच्या सहकार्यानं बांधण्यात येत आहे. यासाठी ज्यूरीक एअरपोर्ट कंपनी ५ हजार ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. या नव्या विमानतळाचं बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात ही २०२४ पासून सुरु होण्याची शक्यता आहे.
नोएडा विमानतळाला लिलावात मिळवल्यानंतर टाटा ग्रुपनं जारी केलेल्या माहितीनुसार या विमानतळावर टाटा ग्रुपतर्फे टर्मिनल, रन वे, एअरसाईड इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, युटिलिटीज आणि लँडसाईट फॅसिलिटिजसह विविध इमारतींचं निर्माण करण्यात येणार आहे. याआधी टाटा ग्रुपने देशातील अनेक विमानतळांवर पायाभूत सुविधा आणि विमानतळ बांधलेले असल्यानं त्यांच्या पाठिशी मोठा अनुभव आहे.
नोएडात तयार करण्यात येत असलेल्या नव्या विमानतळामध्ये संसदेच्या नव्या इमारतीची प्रतिकृती, मुंबईतील ट्रान्स-हार्बर लिंकचा देखावा आणि देशातील काही मेट्रो प्रकल्पांची रेखाचित्रदेखील या विमानतळावर प्रवाशांना दाखवण्यासाठी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळं आता या एअरपोर्टचं निर्माण होणं हे भारतीयांसाठी गौरवास्पद असणार आहे.
नोएडा शहरातील विमानतळ तयार झाल्यानंतर ते देशातील सर्वात मोठं विमानतळ असणार आहे. कारण हे विमानतळ तयार झाल्यानतंर त्याच्या आठ रनवे वरुन वर्षाला १ कोटी २० लाख प्रवासी प्रवास करू शकतील. या विमानतळाला ३६ महिन्यांत तयार होण्याची डेडलाईन देण्यात आली आहे.