Share

…अन् आयुष्यातल्या शेवटच्या मिशनबद्दल बोलताना रतन टाटा टाटांच्या अश्रु अनावर; घेतला लक्षवेधी निर्णय

उद्योगपती रतन टाटांना कोण ओळखत नाही? रतन टाटा अनेक कारणांनी लोकांच्या मनावर राज्य करतात. सामाजिक कामांसाठी त्यांचं योगदान फार मोठं आहे. एवढच नाही तर रतन टाटा यांनी करोनाच्या पहिल्या लाटेत पीएम केअर फंडमध्ये सुमारे दीड हजार कोटी रुपये मदत केली होती.

टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्यांनी देशाच्या आर्थिक उभारणी मोलाचं योगदान दिलं आहे. तसेच गुरुवारी आसाममध्ये 7 कर्करोग देखरेख रुग्णालयांचं उद्घाटन करण्यात आले. तसेच नवीन एका रुग्णालयाच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती होती.

तसेच या कार्यक्रमाला उद्योगपती रतन टाटा हे देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमात रतन टाटांनी ही घोषणा केली. सुरुवातील इंग्रजीतून आणि नंतर हिंदीतून केलेल्या भाषणात त्यांनी म्हटलं की, “मी माझ्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करणार आहे.”

यावेळी बोलताना रतन टाटा यांचा आवाज देखील थरथरत होता. अशा स्थितीतही त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. रतन टाटा म्हणाले की, “मी माझ्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करत आहे.” तसेच यावेळी त्यांचं शरीर थकलेलं दिसलं.

दरम्यान, रतन टाटा पुढे म्हणाले, ‘आसामला असं राज्य बनवा की सर्वांनी त्याचा सन्मान केला पाहिजे. आसामच्या इतिहासातील आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. जागतिक स्तराची कॅन्सर उपचाराची सुविधा आसाममध्ये असेल,’ असं त्यांनी यावेळी बोलताना म्हंटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रतन टाटा देशभरात अनेक ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल सुरु करणार आहेत. मुंबईतल्या कॅन्सर हॉस्पिटलवरील ताण कमी व्हावा यासाठी त्यांनी हा मोठा निर्णय निर्णय घेतला आहे. याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील यावेळी बोलताना टाटा ट्रस्टचे आभार मानले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर आरोग्य ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now