प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा हस्ते मंगळवारी ‘गुडफेलोज’ नावाच्या एका स्टार्टअपचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी एकटेपण आणि म्हातारपणावर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गुडफेलोज स्टार्टअप वयस्कर मंडळींना चांगली सोबत देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी रतन टाटा बोलत होते. (Ratan Tata gave way to the sorrows of old age)
याप्रसंगी रतन टाटा म्हणाले की, ‘एकटं राहणं काय असतं हे तुम्हाला माहीत नाही. जोपर्यंत तुम्हाला एकट्याने वेळ घालवायची वेळ येणार नाही. तोपर्यंत कोणीही म्हातारे व्हावे, असे तुम्हाला वाटणार नाही.’
पुढे ते म्हणाले की,’ गुडफेलोजने तयार केलेले दोन पिढ्यांमधील प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबंध फार अर्थपूर्ण आहेत. यामुळे भारतातील एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नावर उत्तर शोधण्यास मदत होणार आहे. या केलेल्या गुंतवणुकीमुळे गुडफेलोजची युवा टीम अधिक विस्तारण्यास मदत होईल अशी आशा आहे.’
रतन टाटा यांनी यावेळी म्हातारपणी आलेल्या एकटेपणाच्या दुःखावर आणि वेदनेवर भाष्य केले. एकटेपणा काय असतो? याबाबत सुद्धा त्यांनी सांगितलं. रतन टाटा यांनी या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच तो वाढावा यासाठी ते प्रोत्साहन देखील देत आहेत.
सहवेदनेची जाणीव आणि भावना असणाऱ्या सुशिक्षित आणि संवेदनशील पदवीधर तरुणांकडून वृद्धांना खरीखुरी अर्थपूर्ण सोबत व्हावी, हा गुडफेलोज स्टार्टअपचा उद्देश आहे. यात सहभागी होणाऱ्या म्हाताऱ्या व्यक्तींना ग्रँडपल्स म्हंटले जाणार आहे.
याप्रसंगी अभिनेत्री श्रेया पिळगावकर आणि कंटेंट क्रियेटर विराज घेलानी यांनी आपल्या आजी-आजोबांसोबत आणि या सेवेसाठी नावनोंदणी केलेल्या ग्रँडपल्स यांच्या सोबतीने हा उद्घाटनसोहळा पार पडला.
महत्वाच्या बातम्या-
मोदी सरकारचा आदित्य ठाकरेंना मोठा दणका! ५०० कोटींच्या भूखंड वाटपाची होणार चौकशी
आम्ही सरकार चालवत नाही, पुढचे ७/८ महीने कसेतरी सांभाळायचेत; भाजप मंत्र्याची ऑडीओ क्लिप व्हायरल
..त्यामुळे फक्त पांढऱ्या रंगाच्याच गाड्या चोरायचा, पुणे पोलिसांनी अतरंगी चोराला केली अटक