Share

Ratan Tata : रतन टाटांच्या आयुष्यावर बनणार बायोपिक, ‘हा’ अभिनेता साकारणार टाटांची भूमिका 

ratan tata biopic comingsoon |  देशातील दिग्गज उद्योगपती आणि आयकॉन रतन टाटा यांच्यावर लवकरच बायोपिक चित्रपट बनणार आहे. हा चित्रपट रतन टाटा यांच्या जीवनातील काही माहित नसलेल्या पैलूंबद्दल बोलणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुधा कोंगारा करणार आहेत.

२०२३ च्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होऊ शकते. गेल्या काही महिन्यांपासून सुधा या चित्रपटावर रिसर्च करत होत्या. तो रिसर्च पुर्ण झाल्यानंतर आता त्यांनी रतन टाटांवर बायोपिक बनवणार असल्याचे जाहीर केले आहे. या चित्रपटासाठी दिग्दर्शिका सुधा याबद्दल खूप उत्सुक आहे.

रतन टाटा यांच्यासारख्या प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वावर चित्रपट बनवणे हे स्वप्न असल्याचे सुधा यांनी म्हटले आहे. रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांना या चित्रपटाद्वारे रतन टाटा यांच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी ठळकपणे दाखवायच्या आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

असेही म्हटले जात आहे की, निर्मात्यांनी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू केले आहे. निर्माते पुढील वर्षाच्या अखेरीस शुटींगचे कामही सुरू करतील. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाच्या रिसर्चचे काम सुरु होते. पण आता रिसर्च पुर्ण झाल्यामुळे शुटींग सुरु करणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी दोन नावांची चर्चा आहे. पहिला अभिनेता म्हणजे स्टार अभिषेक बच्चन आणि दुसरा अभिनेता साऊथ सुपरस्टार सूर्या. या दोघांपैकी एकाला रतन टाटा यांची भूमिका मिळण्याची शक्यता आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही.

रतन टाटा हे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आहेत. १९९१ पासून टाटा समूहाची सेवा केल्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये सेवानिवृत्ती घेतली. नुकतेच रतन टाटा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संलग्न संस्थेकडून ‘सेवारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय त्यांना २००८ मध्ये  पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-
‘सुर्यासमोर आमची काहीच औकात नाही’; ग्लेन मॅक्सवेल असं का म्हणाला? जाणून घ्या..
Uddhav Thackeray : दोन-चार दिवसात हे पार्सल महाराष्ट्रातून गेलं नाही, तर आम्ही…; उद्धव ठाकरेंचा भाजपला शेवटचा अल्टीमेटम  
सतत संधी मिळूनही अपयशी ठरलेल्या रिषभ पंतमुळे ‘या’ ३ जबरदस्त खेळाडूंची कारकीर्द होतीये उद्ध्वस्त

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now