Share

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा दरोड्याचा प्रयत्न फसला, पोलिसांनी मुसक्या आवळत जप्त केल्या ‘या’ वस्तू

उल्हासनगर शहरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महत्वाची बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमधील एक जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे. उल्हासनगर भागातील हनुमान टेकडी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे उल्हासनगर शहरात खळबळ माजली आहे. (rashtravdi congress party worker arrested by ulhasnagar police in robbery case)

मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर सिंग आणि त्याचे सहकारी उल्हासनगर भागातील हनुमान टेकडी परिसरात राहणाऱ्या पप्या शिंदे यांच्या घरावर दरोडा टाकण्यासाठी जाणार होते. त्यानुसार सुधीर सिंग आणि त्याचे सहकारी रिक्षा आणि दुचाकी घेऊन त्या ठिकाणी आले होते. पोलिसांना या योजनेची गुप्त माहिती मिळाली होती.

त्यानुसार उल्हासनगर पोलिसांनी दोन पथके तयार करून सापळा रचला आणि आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुधीर सिंग हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहर सचिव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून तलवारी, कोयते, लोखंडी रॉड आणि मिरचीची पूड असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

दरोडा प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात आणखी चार आरोपींना उल्हासनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध सुरु आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून दोन विशेष पथके तयार करण्यात आली होती.

उल्हासनगर पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला दरोडा प्रकरणात पोलिसांनी अटक आल्यामुळे उल्हासनगर शहरात खळबळ माजली आहे. या घटनेवरून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.

“उल्हासनगर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीतील अटक केलेल्या आरोपींमध्ये एकजण राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचे कळते. गृहमंत्री आपले आसल्यामुळे दरोडा टाकण्याचा आपल्याकडे परवाना आहे, अशी धारणा राष्ट्रवादीमध्ये तयार झाली आहे काय? झाली असेल तर त्याला जबाबदार कोण गृहमंत्री साहेब?”, असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
अग्निपथ योजनेविरूद्ध संतापाची लाट, तरुणांनी रस्त्यावर उतरून केली जाळपोळ अन् तोडफोड
कौतुकास्पद! वडिलांचं निधन झाल्यानंतर नाही ठेवलं जेवण, त्याच पैशातून नदीवर बांधला पूल
क्रिकेट खेळण्यासाठी कॅन्सरशी लढला अन् ठोकल्या ५४८ धावा, पुर्ण देशात ‘या’ नव्या युवराजची चर्चा

ताज्या बातम्या क्राईम राज्य

Join WhatsApp

Join Now