Share

दिदी मला जेवन करायचय थोडे पैसे देशील का? म्हणणाऱ्या मुलीला मदत न केल्याने रश्मिकाला लोकांनी झापले

Rashmika Mandanna

‘पुष्पा- द राइज’ (Pushpa : The Rise) या चित्रपटामुळे सध्या नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटानं ऑफिसवर धुमाकूळ घालतला. अशातच रश्मिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये असं काही घडले आहे की, लोकांनी रश्मिकाला ट्रोल करायला सुरुवात केली. (rashmika mandanna slammed by netizens)

व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, रश्मिका एका हॉटेलमधून बाहेर येते. तिथे असणारे फोटोग्राफर्स रश्मिकाचे फोटो काढत असतात. तेवढ्यात तिथे काही लहान मुलं येतात. एक मुलगी रश्मिकाच्या जवळ येते आणि म्हणते की, ‘दीदी मला जेवण करायचं आहे, थोडे पैसे देशील का?’. त्यानंतर बाकी लहान मुलं देखील रश्मिकासोबत बोलतात.

पण रश्मिका त्या मुलांची मदत करत नाही आणि गाडीमध्ये बसून निघून जाते. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत रश्मिकाला ट्रोल केले आहे. ‘पैसे किंवा काही तरी खायला दिले असते तर काय झाले असते?’ अशी कमेंट एका नेटकऱ्यांनी केली. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले, ‘त्या मुलांबद्दल वाईट वाटत आहे शंभर रूपये तरी ही देऊच शकते. एवढे पैसे कमावते त्याचा काय उपयोग?’

 

दरम्यान, काही लोकांना रश्मिकाचे हे वागणे अथवा कृत्य आवडले नाही आणि त्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. रश्मिकाने त्या गरीब मुलांना मदत करायला हवी होती, असे लोकांचे म्हणणे आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, माणसाला चेहऱ्याने नाही, मनाने सुंदर असायला हवे.

काही दिवसांपूर्वीच रश्मिकाचे कपडे पाहून लोकांनी तिला ट्रोल केलं. मुंबई एअरपोर्टवर रश्मिका व्हाईट कलरची हुडी व शॉर्ट्स आणि डोक्यावर कॅप अशा अवतारात दिसली. अनेकांना तिचा हा लूक कूल वाटला. पण अनेकांना रश्मिकाचा फॅशन सेन्स पाहून नाकं मुरडली.

काही युजर्सनी मॅम,पँट घालायला विसरल्या का? असा सवाल केला. इतके छोटे कपडे घालून मिरवतात, यांना थंडी वाजत नाही का? अशी कमेंट अन्य एका युजरने केली. लवकरच रश्मिका ही ‘गुडबाय’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रश्मिकासोबत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
याला म्हणतात नशीब! रातोरात स्टार झाला हा बदाम विकणारा व्यक्ती, पहा व्हायरल व्हिडिओ
१२० वर्षांपूर्वीच्या वटवृक्षाला वाचवण्यासाठी २४ तास पहारा देतात गावकरी; असं काय खास आहे त्यात
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात महाराष्ट्रात एफआयआर दाखल; काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या..
रिवा ओव्हर ब्रिजखाली सापडला बॉम्ब, योगी आदित्यनाथ यांच्या नावाची चिठ्ठी मिळाल्यामुळे उडाली खळबळ

इतर बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now