Share

अनेकांच्या मनावर राज्य करणारी रश्मिका मंदाना सोडणार होती चित्रपटसृष्टी, ‘हे’ होते कारण

साऊथची सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) हिला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्या रश्मिकाला राष्ट्रीय क्रश मानले जाते. ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटात रश्मिकाने श्रीवल्लीच्या भूमिकेने धमाल केली आहे. रश्मिका मंदान्नाची लोकप्रियता पाहून तिला केवळ साउथ कडूनच नाही तर बॉलिवूडमधूनही ऑफर्स येत आहेत.(Rashmika Mandana was about to leave the film industry)

‘किरिक पार्टी’ या चित्रपटाद्वारे साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या रश्मिकाचे आज चित्रपटसृष्टीत विशेष स्थान आहे. तिच्या अभिनयावर आणि त्याच्या प्रत्येक पात्रावर चाहते खूप प्रेम करतात.  रश्मिकाचा पहिलाच चित्रपट यशस्वी झाला आणि ती लोकांच्या नजरेत आली. पण तुम्हाला माहीत आहे का की, आजची मोस्ट डिमांड असलेली अभिनेत्री रश्मिका मंदान्ना तिच्या पहिल्या चित्रपटानंतरच फिल्म इंडस्ट्रीला अलविदा करणार होती. याचा खुलासा स्वतः तिनेच केला आहे.

वास्तविक रश्मिका मंदान्नाच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. एका मुलाखतीदरम्यान रश्मिकाने सांगितले होते की, तिला फिल्म इंडस्ट्री सोडून वडिलांच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे आहे. मुलाखतीदरम्यान, जेव्हा तिला विचारण्यात आले की वयाच्या 19 व्या वर्षी काम सुरू करताना तुम्हाला कसे वाटते? या वयात बाकीच्या मुलींसारखं मोकळेपणाने फिरावंसं वाटलं नाही का?

याला प्रत्युत्तर देताना अभिनेत्रीने जे सांगितले ते आश्चर्यचकित करणारे आहे. ती म्हणाली की, मला माझ्या आयुष्यात खूप मजा करायची होती. त्यावेळी मी केलेली मेहनत आज फळाला आली आहे. पण हे खरे आहे की, त्यावेळी मला वाटले होते की मी आता एक चित्रपट केला आहे बास  झाले आता. तसेच माझ्या आई-वडीलांनीही सांगितले की एकच चित्रपट कर आणि मग परत ये. पण माझ्या नशिबाला काही वेगळेच मान्य होते. तुमच्या सर्वांच्या प्रेमाने मला अभिनयाच्या दुनियेत जिवंत ठेवले.

रश्मिका मंदान्नाची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत दहशत निर्माण केल्यानंतर रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्येही धुमाकूळ घालणार आहे. रश्मिका सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
महाशिवरात्रीच्या निमित्ताने या अभिनेत्रीने धारण केला अर्धनारीश्वरचा अवतार; लोकं हात जोडत म्हणाले
चॅलेंज! या फोटोतील बिबट्या शोधून दाखवा, ९९ टक्के लोकं झालेत फेल
आम्हाला काहीच नको फक्त येथून बाहेर काढा, पाणावलेल्या डोळ्यांनी पुण्यातील विद्यार्थ्याने सांगितली आपबीती
राणे पिता- पुत्रांना होणार अटक? दिशा सालियनप्रकरणी पोलिसांकडून नोटीस 

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now