Share

रश्मिकाने ‘या’ बॉलिवूड स्टार्ससोबत काम करण्यास दिला होता साफ नकार, नावं वाचून अवाक व्हाल

साऊथच्या दिग्गज दिग्दर्शकांशिवाय बॉलिवूड (Bollywood) फिल्म इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज दिग्दर्शक रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांना खूप आवडतात. पण याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल की रश्मिकाने बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टार्ससोबत काम करण्याची ऑफर नाकारली आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊ रश्मिकाने कोणते बॉलीवूड चित्रपट करण्यास नकार दिला आणि कोणते बॉलिवूड स्टार त्यात काम करणार होते.(rashmi-refuses-to-work-with-this-bollywood-stars)

kartik.jpg

रश्मिका मंदान्नाने ‘किरिक पार्टी’ या चित्रपटाद्वारे दक्षिण चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. साऊथमध्ये या चित्रपटाच्या यशानंतर चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटाची हिंदी आवृत्ती ‘किरिक पार्टी रिमेक’ बनवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत रश्मिका मंदान्नाला साईन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण रश्मिका मंदान्नाने तिच्याच जुन्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करण्यास नकार दिला. ती म्हणाली की तेच पात्र पुन्हा पुन्हा करायची नाही.

shahid.jpg

शाहिद कपूरचा ‘जर्सी’ हा चित्रपट रिलीज होण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात शाहिद कपूरसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहे. पण या चित्रपटासाठी रश्मिका मंदान्ना ही दिग्दर्शकांची पहिली पसंती होती हे फार कमी लोकांना माहीत असेल. मात्र रश्मिका मंदान्नाने हा चित्रपट करण्यास नकार दिला.

vijay.jpg

साऊथचा ‘मास्टर’ चित्रपट हा सुपरस्टार थलपथी विजयच्या कारकिर्दीतील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी सर्वप्रथम रश्मिका मंदानाशी संपर्क साधला. पण इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्याने ही ऑफर नाकारली.

sanjay_randeep.jpg

बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना अभिनेता रणदीप हुड्डा आणि रश्मिका मंदान्ना यांना घेऊन एक सुपरहिट चित्रपट बनवायचा होता. रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदान्ना यांनी नकार दिल्यानंतर प्रकल्पाची प्रगती होऊ शकली नाही.

रश्मिकाच्या या क्युट स्टाईलवर चाहते जीव ओवाळून टाकतात. तिचा गोंडस लूक लोकांना वेड लावायला पुरेसा आहे, असे चाहते म्हणतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटाने रश्मिका मंदान्नाची लोकप्रियता खूपच वाढवली आहे. आधी रश्मिकाचा डंका फक्त दक्षिणेतच होता, तो आता बॉलिवूडमध्येही वाजत आहे

महत्वाच्या बातम्या-
डुग्गूच्या अपहरणकर्त्याचे पुणे पोलिसांनाच आव्हान, पोलिस चौकीपासूनच झाले होते अपहरण
‘ब्राह्मण ही जात नसून जगण्याचे उत्तम साधन आहे, जन्मापासून मरेपर्यंत सौभाग्यासाठी काम करतात’
मोठी बातमी! भर चौकात प्राध्यापिकेला जाळणाऱ्या तरुणाला न्यायालयाने ठोठावली जन्मठेप

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now