लैंगिक अत्याचारासंबंधीत नुकत्याच पार पडलेल्या एका सुनावणीदरम्यान “पती जरी असला तरी बलात्कार हा बलात्कराच असतो. विवाह म्हणजे पाशवी वृत्तीने अत्याचार करण्याचा परवाना नव्हे.” असे परखड मत कर्नाटक उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. वैवाहिक बलात्काराच्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने आरोपी पतीच्या न्यायाची याचिका फेटाळून लावली आहे.
यावेळी न्यायालयाने म्हटले आहे की, विवाहसंस्थेने कुठल्याही पुरुषास विशेषाधिकार किंवा पाशवी वृत्तीने वागण्याचा परवाना दिलेला नाही, ती देणार नाही किंबहुना असा अधिकार देण्यासाठी ती तयार झालेलीही नाही. बलात्काराच्या गुन्ह्यात पुरुष शिक्षेस पात्र ठरतोच मग तो पती असला तरी दोषीच असतो. त्यामुळे या प्रकरणात पतीच्या बाजूने निकाल दिला तर तो सर्वांना मिळालेल्या समानतेच्या हक्कांच्या विरोधात ठरेल.
पुढे न्यायालयाने यासंबंधीत प्रकरणातील व्यक्तीला खडसावत, “पती असला तरी पत्नीच्या संमतीविना तिच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवणे, हा केवळ बलात्कार मानला जावा. पतीनेचे केलेल्या अशा लैंगिक अत्याचारांमुळे पत्नीला मोठय़ा मानसिक आघाताला तोंड द्यावे लागते. याचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम तिच्यावर होत असतात.” असे मत नोंदविले आहे.
त्याचबरोबर, “पतीच्या अशा गैरवर्तनामुळे पत्नीची आत्मप्रतीष्ठाच खच्ची केली जाते. ती भरून येणारी नसते. त्यामुळे कायदा तयार करणाऱ्यांनी अशा अत्याचारित स्त्रियाच्या मौनाचा आवाज ऐकला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. या अत्याचारांचा अन्वयार्थ लावण्यासाठी कायदे अधिक प्रभावी करण्याची गरज आहे.” असे सुनावणी दरम्यान न्यायालयाने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच वैवाहिक बलात्काराचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी मुले आणि महिलांना प्राधान्य देणे ठीक आहे. परंतु सर्वच विवाहित पुरुषांना बलात्कारी म्हणणे चुकीचे असल्याचे बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले होते. याकारणाने संसदेत नवीन वादाला सुरुवात झाली होती.
दरम्यान कलम ३७५ नुसार, पतीने पत्नीवर जर लैंगिक अत्याचार केले तर ते बलात्काराला अपवाद असतात असे सांगण्यात आले आहे. या कलमात वैवाहिक स्त्रियांच्या संमतीला दुर्लक्षित करण्यात आले आहे. याचीच सूट वैवाहिक पुरुषांना मिळाली आहे. त्यामुळे वैवाहिक बलात्कारासंबंधीत अनेक याचिका न्यायालयात दाखल करण्यात येतात.
महत्वाच्या बातम्या
‘पठाण’ फ्लाॅप झाला तर शाहरूखला राहते घर ‘मन्नत’ विकावे लागणार? वाचा व्हायरल मेसेजमागचे सत्य
‘ताई… राजीनामा देऊ नका’, रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच ढसाढसा रडल्या महीला
विवेक ओबेरॉयच्या या चुकीमुळे तुटले ऐश्वर्या सोबतचे नाते, स्वतः विवेकने केला खुलासा
करिश्मा तन्नाने लग्नाच्या एक महिन्यानंतर केला हैराण करणारा खुलासा, पती पत्नीच्या नात्यातील सांगते ‘हे’ गुपीत