ज्येष्ठ नेते शरद पवार ८० वर्षांचे असले तरी त्यांच्या राजकीय कौशल्याला तोड नाही. त्यांनी राजकारणातील अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत. त्यांच्या अनुभवाचा, राजकीय कौशल्याचा आदर सर्व पक्षांतील लोक करतात. पवारांचा या वयात सुद्धा राजकारणात येणाऱ्या स्वपक्षतीलच नव्हे तर विरोधी पक्षातील तरुणांशी पण संवाद होत असताना अनेकदा पाहायला मिळते. (Raosaheb Danve’s son became a fan of Sharad Pawar)
असेच औरंगाबादमधील एका कार्यक्रमात मंत्री रावसाहेब दानवे यांचा सुपुत्र आमदार संतोष दानवे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. त्यावेळी पवार साहेबांना भेटून आनंद झाला, त्यांचे मार्गदर्शन लाभल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी दिली. त्यांनी या भेटीचा शरद पवारांसोबत असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘औरंगाबाद शहरात आषाढी एकादशी निमित्त आयोजित “गजर विठ्ठलाचा” कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर पवार साहेबांना भेटून त्यांच्या राजकारणातील दीर्घ अनुभवाविषयी जाणून घेतले. त्यांच्या राजनैतिक कौशल्यातून मला नेहमीच प्रेरणा मिळाली,’ अशा शब्दात दानवेंच्या मुलाने शरद पवारांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कार्यक्रमा दरम्यान संतोष दानवे यांनी पवारांशी संवाद साधला. अनेक विषयावर मोकळ्या गप्पा मारल्या. शरद पवार विशिष्ट मुद्यावर दानवेंसोबत बोलत असताना अचानक दोघेही खळखळून हसायला लागले. त्या क्षणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तसे तर दानवे आणि पवार यांच्या अधिवेशनाच्या वेळी नवी दिल्लीतील घरी गाठीभेटी होत असतात. राजकीय विरोधक असले तरी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. मोकळ्या ढाकळ्या स्वभावाच्या दानवे यांना शेतीची आवड आहे.
तर शरद पवार हे कृषी विषयक अभ्यासासाठी, शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयांसाठी, कृषी विषयक धोरणांसाठी देशभरात प्रसिद्ध आहेत. या स्थितीत शरद पवार या ज्येष्ठ नेत्यासोबत विरोधी पक्षात असूनही दानवे यांच्या मुलाचा सुसंवाद हे महाराष्ट्राच्या सभ्य राजकीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्र म्हणता येते.
महत्वाच्या बातम्या-
लग्नाच्या आदल्या दिवशी नवरी झाली गायब, पोलिसांनी शोध घेतल्यानंतर झाला धक्कादायक खुलासा
करिअर सुरू होताच संपलं, ICC ची स्टार क्रिकेटरवर कारवाई, ‘या’ कारणामुळे १० महिन्यांसाठी केलं निलंबित
सुष्मिता सेन आणि ललित मोदींच्या रोमँटिक फोटोवर रणवीर सिंगने दिली हटके प्रतिक्रिया, म्हणाला…